Home /News /entertainment /

‘हे देव आहेत की राक्षस?’; ‘रामयुग’चा ट्रेलर पाहून संतापले नेटकरी

‘हे देव आहेत की राक्षस?’; ‘रामयुग’चा ट्रेलर पाहून संतापले नेटकरी

सीरिजमधील पात्राचे संवाद, त्यांचा अभिनय आणि त्यांचे लूक्स पाहून या सीरिजवर बंदी घातली जावी अशी मागणी केली जात आहे.

    मुंबई 2 मे: भगवान श्री राम यांच्या आयुष्यावर आजवर अनेक मालिकांची निर्मिती करण्यात आली आहे. या यादीत आता आणखी एका मालिकेची भर पडली आहे. या आगामी मालिकेचं नाव ‘रामयुग’ (Ramyug web series) असं आहे. ही बिग बजेट मालिका वेब सीरिजच्या रुपात एम. एक्स प्लेअर (MX Player web series) या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. नुकताच या सीरिजचा पहिला ट्रेलर प्रदर्शित झाला. अन् हा ट्रेलर पाहून प्रेक्षक संतापले आहेत. सीरिजमधील पात्राचे संवाद, त्यांचा अभिनय आणि त्यांचे लूक्स पाहून या सीरिजवर बंदी घातली जावी अशी मागणी केली जात आहे. अभिनेत्री आहे की जलपरी? पाहा इलियानाचं Underwater Photoshoot ‘रामयुग’ ही एक बिग बजेट सीरिज आहे. या सीरिजमध्ये मोठ्य़ा प्रमाणावर स्पेशल इफेक्टचा वापर करण्यात आला आहे. याची एक झलक आपण ट्रेलरमध्ये देखील पाहू शकतो. शिवाय युद्ध करण्याची शैली, शस्त्र आणि सिनेमेट्रोग्राफीमध्ये देखील प्रचंड काम करण्यात आलं आहे. परंतु तरी देखील काही प्रेक्षकांनी या सीरिजवर नाराजी व्यक्त केली. टीकाकारांना यामधील कलाकार, त्यांचा अभिनय, संवाद आवडले नाहीत. “तुम्ही आमच्या देवांचं हे काय केलं आहे? हे देव आहेत की राक्षस?” अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत काही प्रेक्षकांनी जोरदार टीका केली आहे. कोरोना पॉझिटिव्ह अभिनेत्रीनं मागितली मदत; मनोज वाजपेयीनं पोहोचवलं जेवण विशेष म्हणजे हनुमान ही व्यक्तिरेखा अनेकांना आवडलेली नाही. या व्यक्तिरेखेची तुलना रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतील हनुमानाशी केली जात आहे. 90च्या दशकात दारा सिंह यांनी ती व्यक्तिरेखा साकारली होती. त्यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर ही व्यक्तिरेखा अजरामर केली होती. या पार्श्वभूमीवर रामयुगमधील बजरंगबली अनेकांना आवडले नाहीत. परिणामी या सीरिजवर बंदी घालावी अशी जोरदार मागणी केली जात आहे. दरम्यान या वाढत्या टीकेवर निर्मात्यांनी अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Entertainment, Movie review

    पुढील बातम्या