Home /News /entertainment /

बिहारमधील आणखी एका बॉलिवूड कलाकाराचा मुंबईत मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप

बिहारमधील आणखी एका बॉलिवूड कलाकाराचा मुंबईत मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप

आणखी एका बॉलिवूड कलाकाराचा मुंबईत संशयितरित्या मृत्यू झाला आहे. या कलाकाराचे नाव अक्षत उत्कर्ष असे आहे. त्याचे मामा रंजित सिंह यांनी त्यांच्या भाच्याच्या मृत्यूबाबत माहिती देत मुंबई पोलीस यामध्ये सहकार्य करत नसल्याचा आरोप केला आहे.

पुढे वाचा ...
    सुधीर कुमार, मुंबई, 29 सप्टेंबर : मुंबईमध्ये आणखी एका बिहारमधील कलाकाराचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या नवोदित कलाकाराचे नाव अक्षत उत्कर्ष (Akshat Utkarsh) असून तो मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीमध्ये (Film Industry) कार्यरत होता. मिळालेल्या माहितीनुसार तो बॉलिवूडमधील नवोदित कलाकार होता. तो बिहारच्या मुजफ्फरपूरमधील सिकंदरपूरचा मुळ रहिवासी होता. दरम्यान अक्षतच्या कुटुंबीयांनी त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी त्याची हत्या झाली असल्याचा आरोप केला आहे. दिवंगत अभिनेत्याचे मामा रंजित यांनी अशी माहिती दिली आहे की, रविवारी रात्री 9 वाजता अक्षतने त्याच्या वडिलांशी बातचीत केली होती. त्यानंतर उशिरा रात्री त्याच्या मृत्यूची बातमी कळली. त्याचप्रमाणे अक्षतच्या मामांनी मुंबई पोलीस यामध्ये सहकार्य करत नसल्याचा आरोप केला आहे. मुजफ्फरपूरमधील सिकंदरपूरचा रहिवासी असून विजयंत चौधरी उर्फ राजू चौधरी यांचा तो मुलगा होता. त्याचा मृतदेह मुंबईहून त्याच्या राहत्या ठिकाणी पोहोचवण्यात आला आहे. (हे वाचा-SSR Death Case : 'CBI आणि एम्स एकमेकांशी सहमत मात्र आणखी चर्चेची आवश्यकता) (हे वाचा-'क्षितीज प्रसादबरोबर कोणताही गैरव्यवहार नाही', NCB ने सर्व आरोप फेटाळले) मुंबई पोलिसांवर अक्षतच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी याप्रकरणात कोणतेही सहकार्य न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे यामध्ये त्यांनी एफआयआर दाखल करून घेतली नाही, असेही त्याच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणात अद्याप सविस्तर माहिती मिळणे बाकी आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात निर्णाण झालेला गुंता सोडवण्याचे काम देशातील महत्त्वाच्या एजन्सींकडून सुरू आहे. त्यामध्येच ही बातमी आल्याने मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा लक्ष्य केले जात आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Bollywood

    पुढील बातम्या