शूटिंग बंद तर शेतात घाम गाळतोय बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता, पाहा VIDEO

शूटिंग बंद तर शेतात घाम गाळतोय बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता, पाहा VIDEO

सिनेमांचे शूटिंग बंद पडल्यावर बॉलिवूडचा हा प्रसिद्ध अभिनेता शेतात घाम गाळताना दिसत आहे...

  • Share this:

मुजफ्फरनगर, 23 जून : कोरोना व्हायरसमुळे सध्या सर्वच सिनेमांचं शूटिंग बंद आहे. त्यामुळे अनेक बॉलिवूड कलाकार अद्याप घरीच आहेत. पण बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दी सिद्दीकी मात्र कोरोना व्हायरसमुळे असलेल्या या लॉकडाऊनमध्ये त्याच्या मूळ गावी म्हणजे मुजफ्फरनगरला आपल्या शेतात घाम गाळत आहे. नवाझनं त्याच्या ट्विटर हॅन्डलवर नुकताच अक व्हिडीओ शेअर केला. जो खूप व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ रिशेअर केला आहे.

ईदच्या आधी नवाझुद्दीन सिद्दीकी मुंबईतून त्याच्या मूळ गावी मुजफ्फरनगरला गेला होता. तेव्हापासून तो तिथेच आहे. एवढंच नाही तर आपला स्टारडम विसरून नवाझ सध्या त्यांच्या शेतात घाम गाळताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नवाझुद्दीन हातात फावडं घेऊन शेतात काम करताना दिसत आहे.

चाहत्यांनी केलं कौतुक

नवाझुद्दीनं त्याच्या ट्विटरवर शेअर करताना त्याला 'Done For The Day' असं कॅप्शन दिलं आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचे चाहते त्याच्या कामाचं कौतुक करत आहे. एका चाहत्यानं लिहिलं, यशाच्या शिखरावर असतानाही जेव्हा माणूस जमिनीशी नातं राखून राहतो तेव्हा तीच त्याची ओळख बनते. दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, 'सिंपल अँड रिअल ज्याचे पाय जमिनीवर आहे त्याच लोकांना मातीची किंमत कळते.' तर अन्य एका चाहत्यानं लिहिलं, 'तू एक चांगला अभिनेता तर आहेसच पण तू एक चांगला माणूस सुद्धा आहेस जो अद्याप आपल्या मातीला विसरलेला नाही.'

नवाझुद्दीनचा हा व्हिडीओ आतापर्यंत चार हजार पेक्षा जास्त लोकांनी रिट्वीट केला आहे. तर 52 हजार पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.

First published: June 23, 2020, 4:50 PM IST

ताज्या बातम्या