Home /News /entertainment /

Mirzapur 3 मध्येही पाहायला मिळणार 'मुन्ना त्रिपाठी'चे कारनामे; दिव्येंदू शर्माने दिले संकेत

Mirzapur 3 मध्येही पाहायला मिळणार 'मुन्ना त्रिपाठी'चे कारनामे; दिव्येंदू शर्माने दिले संकेत

मिर्झापूर (Mirzapur)च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी. मिर्झापूर 3 मध्येही मुन्ना त्रिपाठीचे कारनामे तुम्हाला बघायला मिळणार आहेत.

  मुंबई, 08 नोव्हेंबर: मिर्झापूर (Mirzapur) या वेब सीरिजच्या दोन्ही सिझन्सना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या सीरिजमध्ये कालीन भय्या (Pankaj Tripathi) आणि मुन्ना त्रिपाठी (Divyendu Sharma) याच्या भूमिका अतिशय दमदार आहेत. दिव्येंदूला मिर्झापूरमुळे स्वत:ची ओळख मिळाली. मिर्झापूर 2च्या शेवटी मुन्ना त्रिपाठी मरतो अस दाखवण्यात आलं असलं तरी मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनमध्येही तो पुन्हा दिसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिव्येंदू शर्माने काय संकेत दिला? मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनमध्येही मुन्ना त्रिपाठीचे कारनामे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. एका मुलाखतीमध्ये दिलेल्या माहितीनुसार स्वत: दिव्येंदूनेच हे संकेत दिले आहेत. दिव्येंदू म्हणाला, ‘ विज्ञानामध्ये मला एक थेअरी शिकवली होती. जगामध्ये फक्त 2 टक्के लोकांचं हृदय डाव्या बाजूला असतं.'
  दिव्येंदू शर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती. त्याने स्वत:च्या मिर्झापूरमधील लूकच्या फोटोसोबत अमर हा शब्द लिहलेलं पोस्टर शेअर केलं होतं. खरंतर मिर्झापूर 2च्या शेवटी गोलू (Shweta Tripathi Sharma) मुन्नाला मारण्यासाठी त्याच्या छातीच्या उजव्या बाजूला पिस्तूल ठेवते आणि गुड्डू पंडित (Ali Fazal) गोलूचा हात पकडून मुन्नाच्या डाव्या बाजूला पिस्तूल धरतो. जर मुन्ना त्रिपाठीचं हृदय उजव्या बाजूला आहे असं दाखवलं जाणार असेल तर मुन्ना नक्की जिंवत राहील असं दाखवण्यात येईल. पण मुन्ना नक्की जिंवत राहतो का? जिवंत राहिला तर तो काय करामती करतो हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना तिसऱ्या पर्वाची वाट पाहावी लागणार आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Web series

  पुढील बातम्या