'बुरखा घालून तिने तिचं स्वातंत्र्य शोधलं...', मुलीवर झालेल्या टीकेवरून अखेर रेहमानने सोडलं मौन

'बुरखा घालून तिने तिचं स्वातंत्र्य शोधलं...', मुलीवर झालेल्या टीकेवरून अखेर रेहमानने सोडलं मौन

प्रसिद्ध गायक ए. आर. रेहमानची मुलगी खातिजा रेहमानला तिच्या कायम बुरखा वापरण्यावरून सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल करण्यात आलं. अखेर या ट्रोलिंगवरून ए. आर. रेहमानाने मौन सोडलं आहे.

  • Share this:

मुंबई, 22 फेब्रुवारी : प्रसिद्ध गायक ए. आर. रेहमानची मुलगी खातिजा रेहमानला तिच्या कायम बुरखा वापरण्यावरून सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल करण्यात आलं. अखेर या ट्रोलिंगवरून ए. आर. रेहमानाने मौन सोडलं आहे. सोशल मीडियावर केवळ बुरख्यातील फोटो अनेकदा पोस्ट केल्यामुळे खातिजा नेहमीच चर्चेत राहिली आहे. प्रसिद्ध लेखिका तस्लीमा नसरीन यांनी खातिजाच्या बुरख्यावरून सोशल मीडियावर टीका केल्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली होती. त्यांच्या मते बुरखा घालण्यासाठी खातिजाचा ब्रेन वॉश करण्यात आला आहे. तस्लीमा यांनी ट्वीट म्हटलं होतं की, ‘मुझे रहमानचं संगीत खूप आवडतं. पण जेव्हा मी त्यांच्या मुलीकडे बघते तेव्हा माझा दम घुटतो. हे अत्यंत दु:खद आहे की अशा सुशिक्षित महिलेचा सुद्धा ब्रेनवॉश होऊ शकतो.’

या टीकेवर खातिजा रेहमानने चोख प्रत्युत्तरही दिलं होतं. ‘तुम्हाला माझ्या कपड्यांमुळे गुदमरल्यासारखं होत असेल तर मला माफ करा. पण त्याकरता तुम्ही शुद्ध हवेत श्वास घ्या कारण या कपड्यांमुळे अजिबात माझा दम घुटत नाही. उलट याचा मला खूप गर्व वाटतो. तुम्ही जरा गुगलवर फेमिनिझमचा अर्थ जरूर बघा. कारण इतर महिलांना अपमानास्पद वागणूक देणे म्हणजे फेमिनिझम नाही होत. मला आठवतही नाही की मी माझा फोटो तपासणीसाठी तुमच्याकडे कधी पाठवला होता’

View this post on Instagram

 

Been only a year and this topic is in the rounds again..there’s so much happening in the country and all people are concerned about is the piece of attire a woman wants to wear. Wow, I’m quite startled. Every time this topic comes the fire in me rages and makes me want to say a lot of things..Over the last one year, I’ve found a different version of myself which I haven’t seen in so many years. I will not be weak or regret the choices I’ve made in life. I am happy and proud of what I do and thanks to those who have accepted me the way I am. My work will speak, God willing.. I don’t wish to say any further. To those of you who feel why I’m even bringing this up and explaining myself, sadly it so happens and one has to speak for oneself, that’s why I’m doing it. 🙂. Dear Taslima Nasreen, I’m sorry you feel suffocated by my attire. Please get some fresh air, cause I don’t feel suffocated rather I’m proud and empowered for what I stand for. I suggest you google up what true feminism means because it isn’t bashing other women down nor bringing their fathers into the issue 🙂 I also don’t recall sending my photos to you for your perusal 🙂

A post shared by 786 Khatija Rahman (@khatija.rahman) on

आता तिच्या या उत्तराबाबत खुद्द ए. आर. रेहमानने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. क्विंटला दिलेल्या मुलाखतीमध्ये रेहमान असं म्हणाला की, ‘मला असं वाटतं की तिने (खातिजा) उत्तर देणं गरजेचं होतं. बुरखा घालण्याचा निर्णय सर्वस्वी तिचा आहे. माझ्या मुलीने बुरखा घालण्याचा निर्णय घेत स्वत:चं स्वातंत्र्य निवडलं आहे. पुरूष बुरखा नाही घालत, जर तसं करता आलं असतं तर मीही केलं असतं.’ अशाप्रकारे मुलीची बाजू सावरून घेत रेहमानने वडिलांचं कर्तव्य बजावलं आहे.

अन्य बातम्या

एअर इंडियाच्या कारभारावर भडकली कृती, स्टाफला दिला शिष्टाचार शिकण्याचा सल्ला

मेरे घर आई एक नन्ही परी! कंगनाच्या घरी आहे गोड बातमी

‘ Great! ’, आयुष्मानच्या शुभ मंगल ज्यादा सावधाननं डोनाल्ड ट्रम्पनाही लावलं याड

First published: February 22, 2020, 5:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading