Home /News /entertainment /

Mirzapur मध्ये भौकाल केल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणार मुन्ना भैया, 'या' नव्या सिनेमाची घोषणा

Mirzapur मध्ये भौकाल केल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणार मुन्ना भैया, 'या' नव्या सिनेमाची घोषणा

शेतकरी आंदोलनाने देशात जोर धरलेला असतानाच मिर्झापूर फेम मुन्ना भय्या अर्थात दिव्येंदू शर्मा (Divyendu Sharma) शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित सिनेमामध्ये झळकणार आहे.

    मुंबई, 08 डिसेंबर: दिल्लीच्या सीमेवर सध्या शेतकरी आंदोलन करत आहेत. अनेक बॉलिवूड कलाकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. अशातच दिव्येंदू शर्मा (Divyendu Sharma) म्हणजे मिर्झापूरमधील तुमचा लाडका मुन्ना भय्या शेतकऱ्यांवर आधारित सिनेमा घेऊन येणार आहे. हा चित्रपट केव्हाच तयार आहे. फक्त लॉकडाऊनमुळे त्याचं प्रदर्शन रखडलं होतं. आता देशभरातील थिएटर सुरू झाली आहेत. तसंच प्रेक्षकही सिनेमागृहांकडे वळायला लागले आहेत. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मेरे देश की धरती ' (Mere Desh Ki Dharti) असे या सिनेमाचं नाव आहे . या मूव्हीविषयी बोलताना दिव्येंदूने बॉम्बे टाईम्सला सांगितले की, 'मी शूटिंग पूर्ण केलं आहे आणि मी त्यात इंजिनिअरची भूमिका साकारत आहे. अभियंता दुर्गम गावात येऊन शेतकर्‍यांची दुर्दशा पाहतो. त्यानंतर शेतीच्या नवीन मार्गांद्वारे तो शेतकऱ्यांना मदत करतो. हा चित्रपट माझ्यासाठी अगदी जवळचा आहे. कारण यामध्ये बळीराजाचा विषय मांडला आहे. या सिनेमातला हीरो शहरातला मुलगा आहे आणि तो आपल्या आयुष्यात खुश नाहीये. त्यामुळे तो गावात जातो आणि ग्रामीण जीवनामुळे त्याच्या आयुष्यास संधी मिळाली आहे. या चित्रपटात दिव्येंदूसोबत अनुप्रिया गोयंका दिसणार आहे. चित्रपटात काम केल्यानंतर दिव्येंदूला शेतकर्‍यांच्या समस्या जास्त जवळून बघता आल्या असं तो म्हणतो. मेरे देश की धरती या सिनेमाबद्दल बोलताना दिव्येंदू बोलतो, 'तुम्ही महाराष्ट्रातल्या विदर्भातील शेतकऱ्यांच्या कथा ऐकल्या असतील आणि त्यांची दुर्दशा तुम्हाला ठाऊक असेल. या चित्रपटाच्या माध्यमातून मला ऊस गिरण्यांमुळे होणार्‍या पाण्याची समस्या समजू शकली आहे. त्यांच्यासाठी केलेल्या योजनांचे पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत.' या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Web series

    पुढील बातम्या