दबंगची मुन्नी आउट, आता सलमानच होणार 'बदनाम'

दबंगची मुन्नी आउट, आता सलमानच होणार 'बदनाम'

याआधीही गायक अतिफ असलमचं गाणं सिनेमातून हटवल्यावर सलमाननं स्वतःच ते गाणं गायलं आहे.

  • Share this:

मुंबई, 8 मे : अभिनेता सलमान खान सध्या दबंग 3च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमातून सलमान पुन्हा एकदा अ‍ॅक्शन अवतारात पाहायला मिळणार आहे. मात्र या सिनेमातून सलमानचा एक सरप्राइझ अवतारही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात अ‍ॅक्शन व्यतिरिक्त आयटम नंबर करतानाही दिसणार आहे. याआधी सलमाननं या सिनेमात गायकाची भूमिकाही पार पाडली आहे. त्यानंतर आता या सिनेमातील आयटम साँगही सलमानच करणारं असल्याचं बोललं जात आहे.

सलमानच्या दंबग सीरिजमधील हा तिसरा सिनेमा आहे आणि या सिनेमात सर्वात पहिल्या 'दबंग'मधील 'मुन्नी बदनाम हुई...' हे गाणं रिक्रिएट करण्यात येणारं असून या गाण्यात अनेक मोठे बदल केले जाणार आहे. या गाण्याचे बोल बदलून 'मुन्नी बदनाम'च्या जागेवर 'मुन्ना बदनाम हुआ...' असं केलं जाणारं आहे. तसेच यात आयटम गर्ल ऐवजी आयटम बॉयची एंट्री होणार आहे. याची सर्व तयारीही निर्मात्यांकडून झाली असून हे गाणं सलमान खानवर हे गाणं चित्रीत केलं जाणारं आहे. सलमान पोलिस ऑफिसर बनण्याअगोदर कॉलेज स्टुडंटच्या भूमिकेत दिसणार असून त्याचवेळी हे गाणं शूट केलं जाणार आहे. असा सिक्वेंस 'दबंग 3'मध्ये ठेवण्यात आला आहे.  त्यामुळे आता मलयकाच्या आयटम नंबरवर डान्स करणारा सलमान प्रेक्षकांच्या पसंतीत कितपत उतरतो हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.
 

View this post on Instagram
 

#DABANGG3 Soon


A post shared by Salman khan (@beingsalnankham) on

या अगोदर सलमाननं अनेक सिनेमात गाणी गायली आहेत आणि ती प्रेक्षांकानी अक्षरशः डोक्यावरही घेतली होती. त्यानंतर आता तो आयटम नंबर करताना दिसणार आहे. त्यांची डान्स स्टाइल सर्वांपेक्षा वेगळी आहे मात्र यावेळी प्रेक्षकांना नवं काय देतो याची प्रेक्षकांना प्रतिक्षा आहे. या सिनेमात  आयटम साँगसाठी पुन्हा एकदा मलायका अरोराचं नाव चर्चेत होतं मात्र अरबाज खानशी घटस्फोट आणि अर्जुन कपूरसोबत असलेल्या अफेअरमुळे नाराज झालेल्या सलमाननं या सिनेमात दुसऱ्या अभिनेत्रीला संधी द्याचं ठरवलं होतं पण आता कोणत्याही अभिनेत्रीवर विश्वास ठेवण्याऐवजी सलमाननं स्वतःच आयटम साँग करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीही गायक अतिफ असलमचं गाणं सिनेमातून हटवल्यावर सलमाननं स्वतःच ते गाणं गायलं आहे.


आता कतरिना कैफला सोडून दीपिकासोबत रोमान्स करणार सलमान खान?

रेखाचे हे फोटो पाहून तुम्ही प्रियांका चोप्राचा मेट गालाचा लुक विसराल

...म्हणून कतरीना म्हणते 'मला ट्विंकल खन्नाची भीती वाटते'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 03:57 PM IST

ताज्या बातम्या