कंगनाविरोधातील खटला लढण्यासाठी BMCने खर्च केले 82 लाख, अभिनेत्रीचे पालिकेवर ताशेरे

कंगनाविरोधातील खटला लढण्यासाठी BMCने खर्च केले 82 लाख, अभिनेत्रीचे पालिकेवर ताशेरे

अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) VS बीएमसी (BMC) या वादात पालिकेला 82 लाख 50 हजारांता भुरदंड सोसावा लागल्याची माहिती समोर येते आहे.

  • Share this:

मुंबई, 28 ऑक्टोबर : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि मुंबई महापालिका हा वाद गेले काही दिवस सुरू आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी (Sushant Singh Rajput Death Case) केलेल्या वक्तव्यावरून ते तिच्या ऑफिसत्या तोडफोडप्रकरणी अभिनेत्री कंगना रणौत विशेष चर्चेत आली आहे. दरम्यान कंगना VS बीएमसी या वादात पालिकेला 82 लाख 50 हजारांता भुरदंड सोसावा लागल्याची माहिती समोर येते आहे.

मुंबई महापालिकेने कंगनाचे पाली हिल याठिकाणचे कार्यालय तोडण्याचे प्रकरण न्यायालयात गेले आहे. सुशांतप्रकरणी केलेल्या वक्तव्यानंतर कंगना विरुद्ध शिवसेना या वादाला सुरुवात झाली. त्यानंतर पालिकेने ‘एच-पश्चिम’ विभाग कार्यालयाने पाली हिल याठिकाणी कंगना रणौतच्या कार्यालयात अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोप करत हातोडा चालवला. याप्रकरणी कंगनाने कोर्टात धाव घेतली आहे. याकरता पालिकेची बाजू ज्येष्ठ वकील, वरिष्ठ अधिवक्ता अस्पी चिनॉय मांडत आहेत. या लढ्यासाठी पालिकेने आतापर्यंत 82 लाख 50 हजार खर्च केले आहेत. चिनॉय यांनी आतापर्यंत 11 वेळा पालिकेची बाजू मांडली आहे. प्रत्येक तारखेसाठी त्यांनी आकारलेल्या 7 लाख 50 हजार शुल्कानुसार पालिकेला इतकी रक्कम मोजावी लागली आहे.

(हे वाचा-Loan Moratorium: चष्मा विकणाऱ्या या व्यक्तीमुळे झाला 16 कोटी लोकांचा फायदा)

शरद यादव यांनी विधि खात्याकडे माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत (Right to Information Act) याबाबत माहिती मागितली होती. कंगना विरुद्ध मुंबई महापालिका लढाईत अस्पी चिनॉय यांना किती रक्कम देण्यात आली,याबाबत ही माहिती मागवली होती. त्यात 82 लाख 50 हजार खर्च झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान अभिनेत्री कंगना रणौत हिने देखील पालिकेच्या या खर्चावरून बीएमसीवर ताशेरे ओढले आहेत. तिने असे म्हटले आहे की, 'माझे घर बेकायदेशीरपणे तोडण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत 82 लाख खर्च केले आहेत. एका मुलीला त्रास देण्यासाठी पप्पू एवढे पैसे खर्च करत आहेत. आज अशाठिकाणी महाराष्ट्र आहे, हे दुर्भाग्यपूर्ण आहे.'

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 28, 2020, 10:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading