जेव्हा मोहम्मद रफींच्या गाण्यानं मुंबईतील एका मुलाचं अ‍ॅडमिशन होतं...

जेव्हा मोहम्मद रफींच्या गाण्यानं मुंबईतील एका मुलाचं अ‍ॅडमिशन होतं...

31 जुलै 1980मध्ये 56 व्या वर्षी मोहब्बत रफी यांचं निधन झालं. आज त्यांचा 39 वा स्मृतीदिन.

  • Share this:

स्‍वतंत्र मिश्र

मुंबई, 31 जुलै : मोहम्मद रफी यांचं निधन होऊन आज चार दशकं झाली. मात्र संगीत क्षेत्रात त्यांची क्रेझ अजिबात कमी झालेली नाही. 40 वर्षांपूर्वी म्हणजेच 31 जुलै 1980मध्ये 56 व्या वर्षी रफी यांचं निधन झालं. मोहम्मद रफी जेवढे मोठे गायक होते. तेवढ्याच मोठ्या मनाचे आणि प्रामाणिक व्यक्ती होते. त्यांच्या प्रामाणिकपणाचे किस्से तसे बरेच आहेत. पण आज त्यांच्या स्मृतीदिना निमित्त त्यातील काही किस्से आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. हे किस्सेच तुम्हाला त्यांच्या महानतेची कल्पना देऊ शकतील.

मुंबई शहरातील ही गोष्ट... रफी साहेबांचा यशाचा आलेख त्यावेळी दिवसेंदिवस उंचवत होता. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एका व्यक्तीनं त्यांना आपल्या मुलाच्या अ‍ॅडमिशनसाठी शिफारस करावी अशी विनंती केली. रफी यांनी विचारलं, माझ्या सांगण्यानं तुमच्या मुलाचं अ‍ॅडमिशन होईल का? तो माणूस म्हणला हो नक्की होईल फक्त त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत शाळेत यावं लागेल. विशेष म्हणजे रफी साहेब यासाठी सहजपणे तयारही झाले.

परिणिती चोप्राला बॉयफ्रेंडनं दिला धोका, भावुक होत मुलाखतीत उलगडलं सत्य

हार्मोनियमची व्यवस्था करा मी गाणं गातो

रफी साहेब जेव्हा त्या शाळेत पोहोचले. त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांना गाणं गाऊन दाखवा मग आम्ही या मुलाला अ‍ॅडमिशन देतो असं सांगितलं. यावर रफी म्हणाले, हार्मोनियम आहे का? यानंतर हार्मोनियम घेऊन ते बसले आणि त्यांनी संपूर्ण शाळेला गाणं गाऊन दाखवलं आणि त्या मुलाचं अ‍ॅडमिशन झालं.

एकदा बॉलिवूड मधील प्रसिद्ध संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल मोहम्मद रफी यांच्याकडे पोहोचले. आणि त्यांना गाणं गाण्याची शिफारस केली. एलपी नावानं प्रसिद्ध झालेल्या या जोडीनं रफी यांना गाण्यासाठी 500 रुपये दिले आणि म्हणाले तुम्ही आमच्यासाठी गाणं म्हणा. रफी यांनी विचारलं, हे तुमचं पहिलं गाणं आहे ना? त्यावर या दोघांनी होकर दिला. त्यावर रफी यांनी आपल्या खिशातून आणखी 500 रुपये आणि काही नाणी काढली आणि दोघांच्याही हातावर 501-501 रुपये दिले आणि म्हटलं. खूप साऱ्या शुभेच्छा तुमची जोडी हीट होवो. मी या गाण्यासाठी पैसे घेणार नाही.

शनायानं शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो, 'हे' आहे कारण

चाहत्याना ऑटोग्राफ देण्याची वाटायची लाज

रफी साहेब एकदा पंजाबमधील पटियालाच्या कोणत्यातरी कॉलेजमध्ये गेले होते. गायक महेंद्र कपूर त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये नवे होते आणि ते रफी यांच्याकडून गाण्यातील बारकावे शिकत होते. रफी महेंद्र कपूरांनाही आपल्यासोबत घेऊन कॉलेजला गेले. दोघंही कॉलेजमध्ये पोहोचले. हे गर्ल्स कॉलेज होतं. तिथं गेल्यानंतर काही मुली त्यांच्याकडे ऑटोग्राफ मागण्यासाठी आल्या. रफी यांनी महेंद्र कपूरांना विचारलं हे काय आहे. त्यावर महेंद्र म्हणाले तुम्ही प्रसिद्ध आहात. तुमची ऑटोग्राफ हवी आहे. रफी म्हणाले महेंद्र तू ऑटोग्राफ देऊन टाक.

साराच्या फॅमिलीला इंप्रेस करण्यासाठी कार्तिक आर्यनची धडपड!

==========================================================

VIDEO: मी गद्दार नाही, भाजप प्रवेशानंतर चित्रा वाघ भावुक!

Published by: Megha Jethe
First published: July 31, 2019, 6:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading