• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Raj Kundra arrest: मोठी बातमी! मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला राज कुंद्राचा अटकपूर्व जामीन अर्ज

Raj Kundra arrest: मोठी बातमी! मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला राज कुंद्राचा अटकपूर्व जामीन अर्ज

मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Session Court) राजचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.

 • Share this:
  मुंबई 11 ऑगस्ट : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. अश्लिल चित्रफिती प्रकरणात तो पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र याविषयी आता नवनवीन खुलासे होत आहेत. तर राजच्या अचणींतही वाढ होताना दिसत आहे. काही अभिनेत्रींचीही यासंदर्भात चौकशी करण्यात आहे. दरम्यान 19 जुलैला मुंबई क्राईम ब्रँचने (Mumbai Crime Branch) राजला अटक केली होती. तर आता या संदर्भात आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. दरम्यान राजला अटक जुलै महिन्यात झाली असली तरी त्याच्यावर केसं खूप आधीच दाखल झाली. फ्रेब्रुवारी महिन्यातच त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तर आता हाती आलेल्या माहितीनुसार मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Session Court) राजचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. 2020 मध्येच त्याच्यावर मुंबई गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे राजला आणखी काही दिवस कोठडीतच काढावे लागण्याची शक्यता आहे.

  HBD: TV पत्रकार, मिस श्रीलंका ते टॉप बॉलिवूड अभिनेत्री, पाहा जॅकलिनचा थक्क करणारा प्रवास

  याशिवाय नुकतीच अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा शेट्टी यांच्यावर फसवणूकिचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब आता पोलिसांच्या रडारवर असल्याचं दिसत आहे. दरम्यान पोलिसांनी शिल्पाचीही काही दिवसांपूर्वीच चौकशी केली होती. तेव्हा पॉर्नोग्राफी प्रकरणात आपला काहीच संबध नसल्याचं तिने म्हटलं होतं.

  HBD: अभिनयानंतर यशस्वी उद्योजकही आहे सुनील शेट्टी; पाहा अभिनेत्याचा प्रवास

  या प्रकरणातील मुख्य समजल्या जाणाऱ्या अभिनेत्री पूनम पांडे आणि शर्लिन चोप्रा यांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. शर्लिनने या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले होते. तसेच राजवर लैंगिक शोषणाचे आरोपही लावले होते. राज आणि शिल्पाचे संबंध चांगले नव्हते असंही ती म्हणाली होती. पोलिसांनी राजच्या अटकेनंतर त्याच्या ऑफिसमधून मोठ्याप्रमाणावर डेटा डिलिट झाल्याचं म्हटलं होतं.
  Published by:News Digital
  First published: