मुंबई, 14 जून : मुंबईतील अंडरवर्ल्डवर आधारित ‘मुंबई सागा’ या सिनेमाची काही दिवसांपासून खूप चर्चा आहे. बॉलिवूडमध्ये आता पर्यंत या विषयावर अनेक सिनेमे तयार झाले आहेत. मात्र या सिनेमाची बातच काही और आहे. या सिनेमाचं विशेष आहे ते म्हणजे या सिनेमाची स्टार कास्ट. मागच्या काही दिवसांपासून या सिनेमासाठी जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मी यांच्या नावांची चर्चा होती. पण या दोघांव्यतिरिक्त या सिनेमात अनेक स्टार कलाकार दिसणार आहे. अनेक दिवस या सिनेमातील कलाकारांच्या नावांविषयी गुप्तता पाळली गेली होती पण आता दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी सिनमातील स्टार कास्टच्या नावावरील पडदा उठवला आहे. मुंबई सागामध्ये जॉन आणि इमरान यांच्यासोबतच अनेक स्टार कलाकार दिसणार असून यामध्ये मुंबईतील अंडरवर्ल्डचं चित्रीकरण केलं जाणार आहे.
फॅनने विकीला पाहूनही दाखवली नाही ओळख, विकीने दिले सोशल मीडियावर उत्तर
‘मुंबई सागा’चे निर्माता भूषण कुमार यांनी या सिनेमतील कलाकारांविषयी त्यांच्या ट्विटरवरून माहिती दिली. आपल्या ट्वीटमध्ये या सिनेमातील कलाकारांचा फोटो शेअर करत, ‘मुंबईतील अंडरवर्ल्डवर आधारित आमचा हा पहिलाच सिनेमा असून यामध्ये 80 आणि 90 व्या दशकातील काळ दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे या सर्व कलाकारांसोबत काम करण्यास मी खूप उत्सुक आहे.’ असं कॅप्शन दिलं. भूषण यांच्या ट्वीटनुसार या सिनेमामध्ये जॉन अब्राहम, इमरान हाश्मी, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अमोल गुप्ते, गुलशन ग्रोवर, प्रतिक बब्बर, रोहीत रॉय अशी तगडी स्टार कास्ट पाहायला मिळणार आहे. भूषण कुमार यांनी शेअर केलेल्या या फोटोमध्ये सिनेमातील सर्व कलाकारांचा स्वॅग लुक पाहायला मिळत आहे.
तब्बू समोर ढसाढसा रडला होता सलमान खान, स्वतःनेच सांगितलं कारण
Our first cinematic take on gangster drama #MumbaiSaga is set in 80's & 90's notorious era. Happy to collaborate with @_SanjayGupta backed by power cast @TheJohnAbraham @emraanhashmi @bindasbhidu @SunielVShetty @rohitroy500 @GulshanGroverGG @prateikbabbar #AmolGupte@TSeries pic.twitter.com/KoEus0Q0E8
— Bhushan Kumar (@itsBhushanKumar) June 14, 2019
या सिनेमाविषयी बोलताना संजय गुप्ता म्हणाले, ‘मागच्या 25 वर्षांत 17 सिनेमांनंतर आम्ही प्रेक्षकांसाठी काहीतरी खूप भव्य आणि वेगळं घेऊन येत आहोत. ‘मुंबई सागा’ माझ्या महत्वाकांशी सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमासाठी मला तसाच एक निर्माता हवा होता आणि भूषण कुमार यांच्यामध्ये तो मला सापडला. त्यांच्यासोबत काम करायला मी खूप उत्सुक आहे.’ सूत्रांच्या माहितीनुसार या सिनेमामध्ये 80 आणि 90 व्या दशकातील काळ दाखवला जाणार असून बॉम्बे ते मुंबई असा या ड्रीम सिटीचा प्रवास दाखवला जाणार आहे.
जसलीन नंतर आता 'या' अभिनेत्रीसोबत बिग बॉसच्या घरात एंट्री घेणार अनुप जलोटा?