शूट संपवून मुंबईला निघालेली कृति सेनन पोहचली चक्क अहमदाबादला

शूट संपवून मुंबईला निघालेली कृति सेनन पोहचली चक्क अहमदाबादला

कृति एका मॅग्झीन शूटसाठी दिल्लीला गेली होती. तिथून निघताना तिनं मुंबईसाठीची फ्लाइट पकडली.

  • Share this:

मुंबई, 3 जुलै : मागच्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं मुंबईला अक्षरशः झोडपून काढलं आहे. सर्व रस्त्यांवर पाणी साचलं असून मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. याचा फटका मुंबईच्या विमान सेवेलाही बसला आहे. मुंबई विमान तळावरून अनेक उड्डाणंही रद्द करण्यात आली. मुंबईतील या मुसळधार पावसाचा फटका फक्त सामान्य जनतेलाच नाही तर बॉलिवूड कलाकारांनाही बसला आहे. अनेकांना त्यांच्या फ्लाइट्स रद्द झाल्यानं प्लानमध्ये बदल करून घरी परतावं लागलं. अशात अभिनेत्री कृति सेननलाही या पावसाचा फटका बसला आहे.

VIDEO : सेल्फी घेताना धक्काबुक्की करणाऱ्या चाहत्याला कतरिनानं असं केलं हॅन्डल

इंडिया टुडेनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दिल्लीतून निघालेली कृति सेनन मुंबई ऐवजी चक्क अहमदाबादला पोहचली आहे. कृति एका मॅग्झीन शूटसाठी दिल्लीला गेली होती. तिथून निघताना तिनं मुंबईसाठीची फ्लाइट पकडली. मात्र मुंबईमध्ये मुसळधार पाऊस असल्यानं हे विमान मुंबई एअरपोर्टला लॅन्ड होऊ शकत नव्हतं. त्यामुळे पायलटनं कोणतीही रिस्क न घेता अहमदाबाद एअरपोर्टला लॅन्ड केलं. ज्यामुळे कृतिचे पुढेचे सर्व प्लान बदलावे लागले. तिला मुंबईला पोहचून नंतर जांबियाला निघायचं होतं मात्र पावसाच्या गोंधळामुळे हा प्लान तिला रद्द करावा लागला.

कंगना रणौतच्या विरोधात उभा राहिला राजकुमार राव, पोलिसही झाले ‘कनफ्युज’

कृति व्यतिरिक्त अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री राकुल प्रीत यांनाही मुंबईच्या पावसाचा फटका बसला आहे. अक्षयचा लंडन व्हेकेशन प्लान रद्द झाला तर राकुल या पावसामुळे एअरपोर्टवरच अडकून पडली होती. कृतिच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच 'पानीपत' सिनेमात दिसणार आहे. यात तिच्यासोबत अर्जुन कपूर, संजय दत्त यांसारख्या स्टार कलाकरांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन अशुतोष गोवारीकर करत आहे. याशिवाय कृति राहुल ढोलकियाच्या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा महिलाप्रधान असून मुंबईतील एका महिला पत्रकाराच्या जीवनावर या सिनेमाची कथा बेतलेली आहे.

फिटनेससाठी दिशा पाटनी जीममध्ये गाळतेय घाम, पाहा व्हिडिओ

=====================================================================

VIDEO: चिपळूणमधील तिवरे धरण फुटल्यानं ग्रामस्थांवर आस्मानी संकट

First published: July 3, 2019, 10:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading