पावसामुळे मुंबईची दैना, अमिताभ बच्चन यांनी घेतली पालिकेची फिरकी! Jalsa | Amitabh Bachchan | Amitabh Bachchan House | Zinat Aman | Do Lafzo Ki

Amitabh Bachchan | Jalsa | विशेष म्हणजे या ट्वीटमध्ये त्यांनी पावसामुळे हाल होणाऱ्या प्रवांशांबद्दल चिंता व्यक्त न करता महागरपालिकेवरच ताशेरे ओढले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jul 2, 2019 02:30 PM IST

पावसामुळे मुंबईची दैना, अमिताभ बच्चन यांनी घेतली पालिकेची फिरकी! Jalsa | Amitabh Bachchan | Amitabh Bachchan House | Zinat Aman | Do Lafzo Ki

मुंबई, 02 जुलै- मुसळधार पावसाने सर्वसामांन्यांप्रमाणे सेलिब्रिटींनाही झोडपलं. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं. यात जुहूमध्ये सर्वाधिक पाणी साचलं. बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर रस्त्यावर पाणी साचल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाली. दरम्यान स्वतः अमिताभ यांनी मुंबईच्या पावसावर एक ट्वीट केलं आहे. विशेष म्हणजे या ट्वीटमध्ये त्यांनी पावसामुळे हाल होणाऱ्या प्रवांशांबद्दल चिंता व्यक्त न करता महागरपालिकेवरच ताशेरे ओढले आहेत. बच्चन यांनी त्यांच्या सिनेमातील एक फोटो शेअर केला. यात त्यंच्यासोबत झिनत अमानही आहेत. यात ते एका होडीत बसले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी लिहिले की, ‘दादा, जरा गोरेगावला न्या’. या फोटोच्यावर त्यांनी टी ३ ‘जलसावरून..’ असा मेसेजही लिहिला. दरम्यान, पावसानं तूर्तास जरी उसंत घेतली असली तरीही हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

टीम इंडियाच्या भगव्या जर्सीवर कमेंट करणं पडलं महाग, ट्रोल झाली अभिनेत्री

Loading...

‘या’ अभिनेत्रीला डेट करतोय विकी कौशल? राधिका आपटेने सांगितलं गुपित

कल्याणमध्ये भिंत कोसळून तिघांचा मृत्यू

कल्याणमधील दुर्गाडी परिसरात नॅशनल उर्दू शाळेची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि एक लहान मुलाचा समावेश आहे. या दुर्घटनेत एक महिला जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

पावसामुळे आज डबेवाल्यांची सेवा बंद

चार दिवसापासून सलग पडणाऱ्या पावसामुळे मुंबईची लाईफ लाईन असण्याऱ्या मुंबई लोकलवर खूप मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे लोकल बंद पडल्या आहेत. त्या तिन्ही मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून सर्व डबेवाले लोकलचा वापर करतात त्यामुळे आज सेवा देता येणे शक्य होणार नाही. मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाचे (डबेवाला संघटनेचे) अध्यक्ष श्री.उल्हास मुके यांनी आज दिनांक 2 जुलै 2019 रोजी डबेवाल्यांची सेवा बंद राहील व उद्या दिनांक 3 जुलै 2019 पासून सेवा नियमित पणे सुरू राहील असे सांगितले.

VIDEO: अमिताभ बच्चन यांच्या घरासमोरही साचलं गुडघाभर पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2019 02:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...