पावसाचा फटका मालिकांनाही, रात्रीस खेळ चाले मालिकेचं चित्रीकरण थांबलं

पावसाचा फटका फक्त चाकरमान्यांनाच नाही तर अनेक मालिकांच्या चित्रीकरणालाही बसला.

  • Share this:

'रात्रीस खेळ चाले' मालिकेत सतत काही ना काही वळणं येत असतात. लोकांच्या आवडीच्या या मालिकेलाही पावसाचा जोरदार फटका बसला आहे. सावंतवाडीमध्ये या मालिकेचा सेट असून जोरदार पावासामुळे शुटिंग थांबवण्यात आलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला याचा फटका बसला. रात्रीस खेळ चाले या मालिकेसोबत माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचं चित्रीकरणही आज थांबवण्यात आलं.

मुंबई आणि परिसरात पहाटेपासूनच पावसानं जोर धरला आहे. हवामान खात्याने आज दिवसभर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे रेड अलर्ट जारी केलं आहे. गेले दोन दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

आज ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने या 6 जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या ठिकाणी 204 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो.

यासोबतच मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही भागात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. या ठिकाणी 65 ते 200 मिमीच्या दरम्यान पाऊस पडू शकतो.

महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7 ऑगस्टपर्यंत दमदार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. यासह धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, सांगली, सोलापूरात पुढचे 4 दिवस हलक्या सरी बरसतील. तसंच संपूर्ण मराठवाड्यातही 4 दिवस हलक्या स्वरुपाचा पाऊस राहील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 4, 2019 02:17 PM IST

ताज्या बातम्या