स्वप्नील जोशी-मुक्ता बर्वेच्या आयुष्यात नवा पाहुणा, ‘मुंबई पुणे मुंबई-३’चा टीझर लाँच

पाच वर्षांपूर्वी ‘मुंबई पुणे मुंबई’ला अभूतपूर्व यश मिळालं. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी आलेल्या त्याच्या सिक्वेलनंतर आता चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 5, 2018 10:26 AM IST

स्वप्नील जोशी-मुक्ता बर्वेच्या आयुष्यात नवा पाहुणा, ‘मुंबई पुणे मुंबई-३’चा टीझर लाँच

मुंबई, 5 आॅक्टोबर : पाच वर्षांपूर्वी ‘मुंबई पुणे मुंबई’ला अभूतपूर्व यश मिळालं. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी आलेल्या त्याच्या सिक्वेलनंतर आता चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे. अशा प्रकारचा मराठीतील हा पहिलाच प्रयत्न असून चित्रपट वर्षाच्या शेवटी प्रदर्शित होत आहे. स्वप्नील म्हणजेच गौतम आणि मुक्ता म्हणजे गौरी यांच्या आयुष्यात आता नवा पाहुणा येणारेय.

‘मुंबई पुणे मुंबई-३’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटातील स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या लोकप्रिय जोडीने रेखाटलेल्या जोडप्याच्या आयुष्यात पुढे काय घडते त्या प्रवासाची स्पष्ट कल्पना हा टीजर प्रेक्षकांना देतो.

चित्रपटाचा सिक्वेल ‘मुंबई पुणे मुंबई-२’ हा दोन वर्षांपूर्वी दिवाळीत म्हणजे २ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर गोवा, गुजरात, कर्नाटक आणि अगदी अमेरिकासारख्या देशांमध्येही चित्रपटाला भरपूर प्रतिसाद लाभला. या चित्रपटाचे शो सॅन फ्रॅन्सिस्को, ह्युस्टन, लॉस एंजेलिस, डेट्रॉइट, सॉल्ट लेक सिटी यांसारख्या परदेशी शहरांमध्येही झाले होते.

दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणतात, “मुंबई पुणे मुंबई’ला एवढे यश मिळेल असे आम्हाला सुरुवातीला वाटलेच नव्हते. ‘मुंबई पुणे मुंबई’ हा आता एक वेगळा ट्रेंड झाला असून प्रेमकथेचा एक वेगळा बाज त्यातून गिरवला गेला आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाची आता सवय लागून राहिली आहे. आता लोकांना गौतम आणि गौरी यांच्या आयुष्यात काय घडते आहे, त्याबद्दल जिज्ञासा लागून राहिलेली असते. या जोडप्याच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात त्यांचा संबंध लोक आपल्या आयुष्याशी जोडू लागले आहेत. मुंबई पुणे मुंबई’चे चित्रीकरण करत असताना आम्हाला या चित्रपटाचा पुढचा भाग येईल असं वाटलं नव्हतं. पण दुसऱ्या भागाचे चित्रीकरण करत असताना या चित्रपटाच्या पुढच्या भागालाही वाव आहे, हे मात्र स्पष्टपणे जाणवलं होतं. येणाऱ्या चित्रपटाच्या कथेबद्दल अधिक काही बोलणं उचित होणार नाही, पण मी एक गोष्ट नक्की सांगू शकतो की, हा तिसरा भागही तेवढाच यशस्वी ठरणार आहे.”

Loading...

‘मुंबई पुणे मुंबई’ या चित्रपटाला मोठं यश मिळालं आणि त्याची अनेक भारतीय भाषांमध्ये पुनःर्निर्मिती झाली. या चित्रपटाची वाहवा संपूर्ण जगातील सिनेरासिकांकडून झाली. प्रेक्षकांनी केलेल्या विनंतीला मान देऊन या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची निर्मिती केली गेली होती. स्वप्नील आणि मुक्ता ही जोडी रसिकांना खूपच भावली होती. दोन्ही चित्रपटांना सिनेरसिकांकडून फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला होता.

ही बाब बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने केलेल्या व्यवसायातूनही स्पष्ट झाली होती. चित्रपटाची ओळख त्याचे गुणी दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्यामुळेही आहे. त्यांनीच या चित्रपटाची कथा लिहिली आहे. चित्रपटाच्या या तिसऱ्या भागातही स्वप्नील आणि मुक्ता ही हिट जोडी प्रमुख भूमिकेत आहे.

एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटच्या नावावर अनेक हिट मराठी चित्रपटांची नोंद आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडीयाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही, टाइम प्लीज, मुंबई पुणे मुंबई-२, बापजन्म आणि आम्ही दोघी यांसारख्या चित्रपटांची निर्मिती आणि त्यांचे सादरीकरण कंपनीने केलं आहे.

PHOTOS तनुश्री-नाना पाटेकर प्रकरणात सेलेब्रिटीज काय काय बोलतायत?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2018 10:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...