मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी कंगनाची होणार चौकशी; पोलिसांनी जारी केला समन्स

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी कंगनाची होणार चौकशी; पोलिसांनी जारी केला समन्स

वांद्रे पोलिसांनी कंगना रणौतच्या (kangana ranaut) चौकशीसाठी समन्स जारी केला आहे.

वांद्रे पोलिसांनी कंगना रणौतच्या (kangana ranaut) चौकशीसाठी समन्स जारी केला आहे.

वांद्रे पोलिसांनी कंगना रणौतच्या (kangana ranaut) चौकशीसाठी समन्स जारी केला आहे.

मुंबई, 23 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या  (Sushant Singh Rajput) आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी (mumbai police) आतापर्यंत सुशांतच्या जवळच्या व्यक्तींसह काही सेलिब्रिटींचीही चौकशी केली आहे आणि आता अभिनेत्री कंगना रणौतचीही (Kangana Ranaut) चौकशी होणार आहे. वांद्रे पोलिसांनी कंगनाच्या चौकशीसाठी समन्स जारी केला आहे. कंगना सध्या शिमलाला आहे. शुक्रवारी सकाळी पोस्टाने हा समन्स तिला पाठवला जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. कंगना चौकशीसाठी तयार आहे मात्र मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ती मुंबईत चौकशीला येण्यासाठी तयार नाही. शिमलाला एखादी टीम पाठवून चौकशी करू शकता, असं कंगनाने सांगितल्याची माहिती मिळते आहे. हे वाचा - धक्कादायक! सुशांतचा ‘छिछोरे’ पाहताना 13 वर्षीय मुलीची आत्महत्या अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या नव्हे तर हत्याच आहे, असा आरोप अभिनेत्री कंगना रणौतने केला होता. सोशल मीडियावर तिने व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर पुन्हा तिनं आणखी एका व्हिडीओतून पुरावेही दिले.  मूव्ही माफियांच्या गँगमधील पत्रकारांनीही आपल्याला खूप त्रास दिला. ज्याप्रमाणे आपल्याबाबत खोट्या बातम्या पसरवल्या त्याचप्रमाणे सुशांतबाबतही पसरवल्या. असं कंगना म्हणाली होती. कंगना रणौतने फिल्म इंडस्ट्रीवर काही गंभीर आरोप केले आहेत. सातत्याने नेपोटिझमबाबत ती बोलत आली. तिला अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी दिला समर्थन दिलं. या प्रकरणाच्या तपासात आपण आपली वक्तव्यं वक्तव्य सिद्ध करू शकलो नाही, तर आपल्याला मिळालेला पद्मश्री पुरस्कार परत करू, असं कंगना एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती. हे वाचा - 'सुशांतची हत्या केली त्यांनी माझंही इमोशनल लिचिंग केलं'; कंगनाने VIDEO पोस्टमधून दिले पुरावे 14 जूनला सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील वांद्र्यात आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तो डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी सध्या मुंबई पोलीस तपास करत आहेत. दरम्यान सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणीही होऊ लागली. अभिनेता शेखर सुमन, भाजप नेत्या रूपा गांगुली, डॉ. सुब्रमण्यम स्वामी आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. मात्र मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने चालला आहे. या प्रकरणी CBI चौकशीची गरज नाही, असं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.
First published:

Tags: Kangana ranaut, Sushant Singh Rajput

पुढील बातम्या