Home /News /entertainment /

'बबड्या एक जबाबदार नागरिक...', या कारणासाठी मुंबई पोलिसांनी केले सोहमचे कौतुक

'बबड्या एक जबाबदार नागरिक...', या कारणासाठी मुंबई पोलिसांनी केले सोहमचे कौतुक

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मास्क वापरण्याबाबत जनजागृती करण्यासाठी एक कमाल मीम शेअर केले आहे.

    मुंबई, 20 ऑगस्ट : कोरोनाच्या (Coronavirus) संकटकाळात काही खबरदारींचे पालन करणे आवश्यक आहे. यामध्ये मास्क वापरणे तर बंधनकारच आहे. सरकारी गाइडलाइननुसार सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) देखील वारंवार याबाबत सूचना देत आहेत. नुकतेच मुंबई पोलिसांनी मास्क वापरण्याबाबत जनजागृती करण्यासाठी एक कमाल मीम शेअर केले आहे. मुंबई पोलिसांच्या सोशल मीडियावरील पोस्टचे वेळोवेळी कौतुक होत असते. कल्पकतेने जागृती करण्याच्या त्यांच्या शैलीची नेहमी प्रशंसा केली जाते. यावेळी ही मुंबई पोलिसांनी मास्क वापरण्यासाठी केलेली पोस्ट सोशल मीडिया युजर्सच्या पसंतीस उतरत आहे. मुंबई पोलिसांनी यावेळी ट्वीट करताना झी मराठीच्या 'अग्गबाई सासूबाई' या मालिकेतील 'बबड्या' या प्रसिद्ध भूमिकेतील कलाकाराचा फोटो वापरला आहे. अभिनेता आशुतोष पत्की (Ashutosh Patki) हा सोहम उर्फ ‘बबड्या’ची भूमिका साकारत आहे. (हे वाचा-'भाभीजी घर पर है' मध्ये दिसणार नाही गोरी मेम, या कारणामुळे सोडली मालिका) यामध्ये मुंबई पोलिसांनी बबड्याचा मास्क घातलेला फोटो शेअर केला आहे. 'कथानकात 'ट्विस्ट' आहे! बबड्या चांगला की वाईट आम्हाला ठाऊक नाही परंतु बबड्या एक जबाबदार नागरिक नक्कीच आहे', असं कॅप्शन देखील त्यांनी या फोटोला दिले आहे. त्यानंतर त्यांनी #UseMask असा हॅशटॅग वापरून मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. (हे वाचा-पाकिस्तानी अभिनेत्याला घेऊन सुशांतवर सिनेमा? OTT प्लॅटफॉर्मने दिलं स्पष्टीकरण) मुंबई पोलीस नेहमीच सिनेमा-मालिकांमधील कलाकारांचे फोटो पोस्ट करून अनोख्या स्टाइलने जनजागृती करत असतात. मात्र हे बबड्याचे मीम खास आहे. कारण सध्या बबड्याचे मीम्स हा सोशल मीडियावरील ट्रेंडिंग विषय आहे. सोशल मीडियावर बबड्या आणि त्याचे कारनामे विशेष प्रसिद्ध आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आवडीच्या विषयाचा वापर करत मुंबई पोलिसांनी अशी जनजागृती केली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Mumbai police

    पुढील बातम्या