मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Ranveer Singh Nude Photoshoot: रणवीरच्या न्यूड फोटोशूट प्रकरणी मोठी अपडेट, मुंबई पोलिसांकडून नोटीस

Ranveer Singh Nude Photoshoot: रणवीरच्या न्यूड फोटोशूट प्रकरणी मोठी अपडेट, मुंबई पोलिसांकडून नोटीस

अभिनेता रणवीर सिंह न्यूड फोटोशूट प्रकरणी मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली असून रणवीर सिंहला 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे.

अभिनेता रणवीर सिंह न्यूड फोटोशूट प्रकरणी मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली असून रणवीर सिंहला 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे.

अभिनेता रणवीर सिंह न्यूड फोटोशूट प्रकरणी मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली असून रणवीर सिंहला 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे.

    मुंबई, 12 ऑगस्ट: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह मागच्या काही दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोशूट प्रकरणी चर्चेत आला आहे. एका मॅग्झीनसाठी केलेलं हे न्यूड फोटोशूट प्रकरण रणवीरला चांगलंच भोवलं आहे. मुंबईसह देशभरात रणवीर विरोधात अनेक ठिकाणी या प्रकरणी तक्रार आणि गुन्हा दाखल करण्यात आला. काही दिवसांसाठी हे प्रकरण निवळल्याचं वाटत होतं मात्र रणवीर सिंह न्यूड फोटोशूट प्रकरण काही संपायचं नाव घेत नाही. रणवीर सिंह न्यूड फोटोशूट प्रकरणी मोठी अपडेट समोर आली असून या प्रकरणी नोटीस बजावण्यासाठी मुंबई पोलीस रणवीर सिंहच्या घरी दाखल झाले आहेत. मुंबई पोलीस रणवीरच्या घरी पोहोचले मात्र रणवीर सिंह घरी नसल्याची माहिती समोर आली. दरम्यान रणवीर सिंह 16 ऑगस्टला मुंबईत परत येणार येणार असून मुंबई पोलिसांची नोटीस स्वीकारुन त्याचा खुलासा सादर करणार आहे.   मुंबई पोलिसांनी काढलेल्या नोटीशीनुसार रणवीर सिंहला 22 ऑगस्टला चेंबूर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे. या निमित्तानं रणवीरचं न्यूड फोटोशूट प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. रणवीर विरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले त्यातील मुंबईच्या चेंबूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची चौकशी होणं बाकी होतं. याच प्रकरणी रणवीरला नोटीस बजावण्यासाठी मुंबई पोलिसांचं पथक त्याच्या घरी गेलं होतं मात्र रणवीर सध्या सहकुटुंब  मुंबई बाहेर असल्याची समोर आलं आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला आज तरी त्याला नोटीस बजावली नसून तो मुंबईत परत आल्यावर त्याला नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच रणवीर मुंबईत परतल्यावर तो स्वत: नोटीस स्वीकारणार आहे. हेही वाचा - Laal Singh Chaddha विरोधात कोल्हापूरात भाजप, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक; सिनेमाच्या पोस्टरवर शाईफेक अभिनेता रणवीर सिंह नेहमीच त्याच्या अतरंगी फोटोशूटमुळे चर्चेत असतो. त्याची जगावेगळी फॅशन पासून अनेक जण त्याचं कौतु करतात पण त्यात त्याला ट्रोल करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. दरम्यान रणवीरनं एका मॅन्झीन कव्हरसाठी केलेल्या न्यूड फोटोशूटची बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा झाली. अनेक बॉलिवूड कलाकारांनी आणि त्याच्या चाहत्यांनी त्याचं याबद्दल कौतुक केलं तर अनेकांनी त्यांना वाईट शब्दांत ट्रोल करण्यास सुरुवात केली. हे ट्रोलिंग प्रकरणी इतकं वाढलं की याविरोधात अनेक संघटना एकत्र आल्या. रणवीरनं न्यूड फोटशूट करुन महिलांचा भावना दुखावल्याचाही आरोप करण्यात आला.
    Published by:Minal Gurav
    First published:

    Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News

    पुढील बातम्या