अमिताभ बच्चन यांची फिल्म दाखवणं पडलं महागात; मुंबई पोलिसांनी चॅनेल केले सील

अमिताभ बच्चन यांची फिल्म दाखवणं पडलं महागात; मुंबई पोलिसांनी चॅनेल केले सील

चॅनेलच्या एका चुकीमुळे त्यांना चांगलाच दणका बसला आहे.

  • Share this:

मुंबई, 25 जानेवारी : बिग बी (Big B) अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांची फिल्म पाहायला कुणाला आवडणार नाही. अशीच त्यांची फिल्म दाखवणाऱ्या दोन चॅनेलना चांगलंच महागात पडलं आहे. अमिताभ बच्चन यांची फिल्म दाखवणाऱ्या दोन चॅनेलना (channel) मुंबई पोलिसांनी (Mumbai police) दणका दिला आहे. दोन्ही चॅनेल मुंबई पोलिसांनी सील केले आहेत. या प्रकरणात चॅनेलच्या सीईओला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत तर केबल नेटवर्कचा तपास सुरू आहे.

मुंबई पोलिसांनी माहा मुव्हीज (maha movies) आणि बॉक्स सिनेमा (box cinema) हे दोन चॅनेल सील केले आहेत. या दोन्ही चॅनेल्सनी अमिताभ यांची फिल्म कॉपीराइट न घेता दाखवली असा आरोप आहे. या फिल्म्सच्या दिग्दर्शकाच्या मुलानं मुंबई पोलिसात तक्रार केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आज तकच्या रिपोर्टनुसार प्रकाश मेहरा यांचा मुलगा पुनीतनं मार्च 2020 मध्ये बॉक्स सिनेमाविरोधात तक्रार नोंदवली होती. बॉक्स सिनेमानं 12 मार्च 2020 रोजी जुहूमध्ये फिल्म जंजीर  दाखवली होती. या फिल्मचे कॉपीराइट्स आपल्या वडिलांकडे आहेत, दुसऱ्या कुणाकडेच नाहीत असं त्यानं सांगितलं. त्यानंतर ऑक्टोबर  2020 मध्ये राजू खान आणि घनश्याम सूरज गिरी नावाच्या व्यक्तींना जुहू पोलसांनी जंजीरचे प्रिंट्स विकल्यानं अटक केली होती आणि गुन्हा दाखल केला.

हे वाचा - 6 महिन्यांपूर्वीच दिले होते आत्महत्येचे संकेत; अभिनेत्रीने आयुष्याचा केला शेवट

या प्रकरणाचा तपास करत असताना माहा मुव्ही चॅनेलनंदेखील प्रकाश यांची फिल्म जादूगर, लावारिस, जंजीर, मोहब्बत के दुश्मन आणि मुकद्दर का सिकंदर या फिल्म्स जून 2020 ते नोव्हेंबर 2020 दरम्यान दाखवण्यात आल्याचं समोर आलं आणि यासाठी त्यांनी मेकर्सची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. डायरेक्टर प्रकाश मेहरा यांच्या पाच फिल्म कॉपीराइटशिवायच या चॅनेलवर दाखवण्यात आले असा आरोप आहे.

हे वाचा - VIDEO : गायिकेने असा छेडला सूर, कुत्रा-मांजरांपासून माणसांची झाली अशी अवस्था

आता मुंबई पोलिसांनी या पाच फिल्मसह 340 फिल्म्सची प्रिंट माहा मुव्हीजच्या ऑफिसमधून जप्त केले आहेत. यामध्ये काही रिल्स तर काही डिजिटाइज्ड आहेत.  काही दिवसांपूर्वीच माहा मुव्हिजचे सीईओ संजय वर्माला मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचनं अटक केली होती. त्याला कोर्टातही  हजर करण्यात आलं होतं. त्याच्या चौकशीसाठी कोर्टानं मुंबई पोलिसांना 27 जानेवारीपर्यंत अवधी दिला आहे. दरम्यान चॅनेलचे मालिक दर्शन सिंह आणि विश्वजीत शर्मा  फरार असल्याचं सांगितलं जातं आहे.

Published by: Priya Lad
First published: January 25, 2021, 10:34 PM IST

ताज्या बातम्या