Home /News /entertainment /

Raj Kundra Case: शिल्पाचं स्टेटमेंट आलं समोर, म्हणाली 'मी कामात व्यस्त होते, त्यामुळे..'

Raj Kundra Case: शिल्पाचं स्टेटमेंट आलं समोर, म्हणाली 'मी कामात व्यस्त होते, त्यामुळे..'

मुंबई पोलिसांना शिल्पाने दिलेलं स्टेटमेंट आता समोर आलं आहे. शिल्पाने म्हटलं आहे की, ती तिच्या कामात फारच व्यस्त होती त्यामुळे राज काय करत होता याची तिला कल्पना नाही.

  मुंबई 16 सप्टेंबर : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राविरोधात (Raj Kundra) मुंबई क्राइम ब्रँचने (Mumbai crime Branch) बुधवारी एक चार्जशीट दाखल केली आहे. तर या चार्जशीटमध्ये 43 लोकांची साक्षही नोंदवण्यात आली आहे. त्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि शर्लिन चोप्राचाही (Sherlyn Chopra) समावेश आहे. दरम्यान 1500 पानांची ही चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. पोर्नोग्राफी प्रकरणात असलेला राज कुंद्रा आणि अन्य काही लोक यांच्याविरोधात ही चार्जशीट बनवण्यात आली आहे. तर आता शिल्पाचं स्टेटमेंट समोर आलं आहे. मुंबई पोलिसांना शिल्पाने दिलेलं स्टेटमेंट आता समोर आलं आहे. इंडियन एक्स्प्रेस ने दिलेल्या वृत्तानुसार शिल्पाने म्हटलं आहे की, ती तिच्या कामात फारच व्यस्त होती त्यामुळे राज काय करत होता याची तिला कल्पना नाही. शिल्पाच हे स्टेटमेंट मुंबई पोलिसांकडून राज कुंद्रा आणि विआन कंपनीवर तसेच राजच्या साथीदारांवर दाखल केलेल्या चार्जशीटचा भाग आहे. शिल्पाने स्टेटमेंट मध्ये म्हटलं आहे की, “राज ने 2015 साली वीआन इंडस्ट्रीज ची स्थापना केली होती. मी 2020 पर्यंत त्याच्या सोबत डायरेक्टर म्हणून काम पाहत होते. पण नंतर वैयक्तिक कारणांनी मी राजीनामा दिला. पुढे शिल्पा म्हणाली मला hotshot किंवा bollyfame या ॲप्स विषयी कोणतीही माहिती नाही. मी माझ्या कामात खूपच व्यस्त होते त्यामुळे राज काय करत होता मला माहिती नाही.”
  मुंबई पोलिसांनी दावा केला आहे की, hotshot आणि bollyfame ॲप्स साठी विआन कंपनीच्या ऑफिस चा उपयोग झाला आहे. तर या ॲप्स द्वारे अश्लील चित्रफिती ऑनलाईन अपलोड केल्या जात होत्या. विआन इंडस्ट्रीज संचालक थॉर्प याच्याविरोधातही हे चार्जशीट आहे. त्यासाठी शिल्पा सहित शर्लिन चोप्रा आणि एकूण 43 लोकांची साक्ष घेण्यात आली होती.

  हातात तोडे आणि भरजरी लेहंगा, 'देवमाणूस'च्या डिम्पलचा साजशृंगार पाहून चाहते घायाळ

  जवळपास दोन महिने राज कुंद्रा कोठडीत आहे. 19 जुलै 2021 ला राजला अटक करण्यात आली होती. पोर्नोग्राफी प्रकरणात राजसह त्याच्या काही साथीदारांना अटक करण्यात आली होती. राज कुंद्राच्या जामीन अर्जावर 16 सप्टेंबरला पुन्हा एकदा सुनावनी होणार आहे. 8 सप्टेंबरला राजच्या वकिलांनी कोर्टाकडे पुढची तारीख मागीतली होती. दरम्यान केसची तारीख असताना शिल्पा शेट्टी वैष्णो देवीच्या दर्शनाला गेली आहे. राज जेल मध्ये गेल्यानंतर अनेक दिवस शिल्पा मीडियापासून दूर होती. तर तिच्या कामावरही गैरहजर होती. पण नंतर तिने कामही सुरू केलं. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तिच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं होतं. मुलांसोबत ती एन्जॉय करताना दिसली.
  Published by:News Digital
  First published:

  पुढील बातम्या