मुंबई, 25 जानेवारी : बॉलिवूड अभिनेता नसीरुद्दीन शाह काही दिवसांपूर्वी CAA आणि NCR च्या मुद्द्यावरु अनुपम खेर यांच्याशी झालेल्या वादामुळे चर्चेत आले होते. त्यानंतर आता त्यांची मुलगी हीबा शाह हिच्या विरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नसीरुद्दीन यांच्या मुलीवर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
हीबा शाहवर वेटनरी क्लिनिकनं मारहाणीचा आरोप केला आहे. हीबानं 16 जानेवारीला या क्लिनिकच्या 2 महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे. मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून ANI नं ट्विटरवर यासंबंधीची CCTV फुटेज शेअर केली आहेत.
Mumbai's Versova police have registered a non-cognizable offence against actress Heeba Shah (daughter of actor Naseeruddin Shah) for allegedly assaulting 2 employees of a veterinary clinic on January 16. pic.twitter.com/M2u4rdgGTL
— ANI (@ANI) January 25, 2020
फेलाइन फाउंडेशननं दिलेल्या माहितीनुसार हीबा 16 जानेवारीला तिच्या एका मैत्रिणीसोबत या क्लिनिकमध्ये दोन मांजरींची नसबंदी करण्यासाठी गेली होती. पण काही करणानं हे ऑपरेशन होऊ शकलं नाही. त्यामुळे हीबानं तिथल्या स्टाफसोबत वाद घालायला सुरुवात केली आणि त्यांना धमकी देऊ लागली. पण हे प्रकरण पुढे एवढं वाढलं की हीबानं क्लिनिकच्या 2 महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केली.
हीबाच्या विरोधात मुंबई पोलिसांनी भादवि कलम 323, 504 आणि 506 खाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान हीबानं हे सर्व आरोप फेटाळले असून आपण कोणालाही मारहाण केली नाही तर या क्लिनिकचे कर्मचारी मला आत येऊ देत नव्हते तिथल्या महिला कर्मचाऱ्यांनी मला धक्काबुक्की केली असं तिचं म्हणणं आहे.
याशिवाय अभिनेता नसीरुद्दीन शाह काही दिवसांपूर्वी CAA आणि NCRच्या मुद्द्यावर त्यांच्या अनुपम खेर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. ते म्हणाले होते, ‘मी ट्विटर वापरत नाही. अनुपम खेर सारखे बरेच माझ्याबाबत काही ना काही बोलत असतात. पण मी त्यांच्याकडे गांभीर्यानं लक्ष देत नाही. तो एक जोकर आहे. हे त्याच्या रक्तात आहे त्यामुळे आपण त्याची मदत करु शकत नाही.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Naseeruddin Shah