Sushant Singh Rajput Case : पोलिसांना सापडले महत्त्वाचे पुरावे, आता या व्यक्तींची होणार चौकशी

Sushant Singh Rajput Case : पोलिसांना सापडले महत्त्वाचे पुरावे, आता या व्यक्तींची होणार चौकशी

सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याची सुसाइड नोट तर मिळाली नाही पण आता पोलिसांनी या केसबद्दल महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत.

  • Share this:

मुंबई, 18 जून : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे सध्या बॉलिवूडमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. सुशांतनं त्याच्या वांद्रे येथील त्याच्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय यावरून सध्या सोशल मीडियावर बराच वाद सुरू आहे. काहीनी नेपोटीझममुळे त्यानं आत्महत्या केली असं म्हटलं आहे तर काहींनी त्याच्या पर्सनल लाइफवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे मुंबई पोलीस सर्व बाजूनी तपास करत आहेत. अशात आता पोलिसांना आता मोठी माहिती हाती लागली आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याची सुसाइड नोट तर मिळाली नाही पण आता पोलिसांनी या केसबद्दल महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याची माहिती मिळत आहे. टाइम्स नाऊनं दिलेल्या वृत्तानुसार सुशांतच्या घरातून पोलिसांना त्याच्या 5 पर्सनल डायऱ्या सापडल्या आहेत. ज्यात लिहिलेल्या गोष्टींवरून त्याच्या आत्महत्येचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या डायरीमध्ये सुशांत वाचलेल्या पुस्तकांच्या महत्त्वाच्या नोट्स लिहित असे असा दावा एका मीडिया रिपोर्टमध्ये केला गेला आहे. त्यामुळे सुशांतच्या डायरीच्या हिशोबानं आता अनेक जवळच्या व्यक्तीची चौकशी होऊ शकते.

'मला माफ कर माझ्या बाळा' सुशांतच्या बहिणीची भावनिक पोस्ट वाचून डोळ्यात येईल पाणी

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आधीच त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू आहे. याशिवाय या प्रकरणात कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राची चौकशी झाली असून त्यानं यानंतरही कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करणार असल्याचं सांगितलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार सुरुवातीच्या तपासात सुशांतनं काम न मिळत असल्यानं नैराश्यात असं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळाली आहे. मात्र यावर अधिक तपास सुरू आहे.

दरम्यानअभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या अस्थिकलशांचे आज गुरुवारी पाटणा येथे विसर्जन करण्यात आले. गुरुवारी दुपारी पाटणा येथील गंगा घाटावर सुशांत सिंह राजपूत याच्या कुटुंबीयांनी त्याच्या अस्थीचं विसर्जन केलं. कुटुंबीयांनी बोटीतून जात गंगेच्या मध्यभागी त्याच्या अस्थिंचं विसर्जन केलं. यावेळी सुशांतसिंग राजपूत यांचे वडील के के सिंग, बहीण श्वेतासिंग कृती यांच्यासह कुटुंबातील काही खास लोक उपस्थित होते.

सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्ती पोलीस स्थानकात हजर, चौकशी सुरू

First published: June 18, 2020, 3:35 PM IST

ताज्या बातम्या