अभिनेता आदित्य पांचोली विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल Aditya Pancholi | Rape Case | Mumbai Police |

अभिनेता आदित्य पांचोली विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल Aditya Pancholi | Rape Case | Mumbai Police |

Aditya Pancholi | Rape Case | Mumbai Police | मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता आदित्य पांचोली विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. एएनआयने ट्विटरवर याबद्दल माहिती दिली.

  • Share this:

मुंबई, 27 जून- मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता आदित्य पांचोली विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. एएनआयने ट्विटरवर याबद्दल माहिती दिली. वर्सोवा पोलिसांनी पांचोली विरोधात कलम ३७६, ३२८,३८४, ३४१, ३४२, ३२३, ५०६ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आले. प्रकरण १० वर्ष जुनं असल्यामुळे आदित्य विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी त्याच्याविरुद्धचे पुरावे गोळा करणं हे कठीण असणार आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

असे असले तरी पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. पीडितेने केलेल्या तक्रारीमध्ये आदित्य पांचोलीने अनेकदा तिच्यावर बलात्कार केल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी तिने पांचोलीविरुद्ध लिखीत तक्रारही नोंदवली होती. पीडितेने आदित्यविरुद्ध गुन्हा दाखल करताना म्हटलं की, ती १७ वर्षांची असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. एवढंच नाही तर मदतीसाठी ती पोलिसांकडे गेली असता त्यांनी आदित्यला फक्त समज दिला आणि सोडून दिले.

आदित्यने २०१५ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या बाजीराव मस्तानी या सिनेमात शेवटचं काम केलं होतं.

करोडपतीच्या सेटवर सयाजी शिंदेंनी केला सरप्राईज संदर्भातला खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2019 06:38 PM IST

ताज्या बातम्या