मुंबई पोलिसांनी ट्विटरवर ब्लॉक केल्यावर, अभिनेत्रीने अमित शहांकडे घेतली धाव

मुंबई पोलिसांच्या या पक्षपातानंतर तर मला भारतात राहायला भीती वाटत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 11, 2019 05:08 PM IST

मुंबई पोलिसांनी ट्विटरवर ब्लॉक केल्यावर, अभिनेत्रीने अमित शहांकडे घेतली धाव

मुंबई, 11 जुलै- सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री पायल रोहतगीने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित करत, ते पक्षपात करत असल्याचा आरोप केला होता. मुंबई पोलिसांनी ट्विटरवर तिला ब्लॉक केलं असल्याचं पायलचं म्हणणं आहे. तिने याची तक्रार चक्क गृहमंत्री अमित शहा यांनाच केली. पायलने शाह यांना मेल लिहून मुंबई पोलिसांनी तिला ब्लॉक केलं असल्याचं म्हटलं. पायलने ट्विटरवर मुंबई पोलिसांनी ब्लॉक केल्याचा स्क्रीन शॉट शेअर करत म्हटलं की, ‘मुंबई पोलिसांनी मला ब्लॉक का केलं... मुंबई पोलिसांच्या या पक्षपातानंतर तर मला भारतात राहायला भीती वाटत आहे.’

पायलने यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ईमेल केला आहे. या मेलमध्ये लिहिले की, ‘हॅलो अमित शहा सर, आशा व्यक्त करते की सर्व काही चांगलं असेल. तुम्हाला त्रास दिल्याबद्दल क्षमा मागते. पण आज सकाळी मला माझ्या ऑफिसमधून कळलं की, मुंबई पोलिसांनी माझं वेरिफाइट अकाउंट ब्लॉक केलं आहे. नियमित कर भरणाऱ्या नागरिकासोबत असं होणं हे माझ्यासाठी फार धक्कादायक आहे.’

एवढंच नाही तर पायलने पुढे लिहिले की, ‘एजाज खान नावाच्या अभिनेत्याने एका व्हिडिओत माझ्या विरोधात अनेक आक्षेपार्ह वक्तव्य केले. या सगळ्या गोष्टींकडे मी दुर्लक्ष केलं. पण आता तुम्हीच या प्रकरणात लक्ष घालावं अशी मी आशा करते.’ पायलने या मेलसोबत तिच्याबद्दल अपशब्द वापरण्यात आलेली एक लिंकही शेअर केली.

पराभवानंतर कोहलीवर भडकला अभिनेता, म्हणाला- 'सोडून दे कॅप्टन्सी'

Sand Ki Aankh Teaser: घरच्यांवरच गोळी चालवणाऱ्या तापसी- भूमीचा अॅक्शनपॅक्ड स्वॅग

अभिनेत्रीसोबत कॅब ड्रायव्हरने केली गैरवर्तवणूक, शिव्या देऊन गाडीतून उतरवलं

बिग बी नंतर हा अभिनेता ठरला असता सुपरस्टार; 2002 नंतर मिळाली नाही एकही फिल्म

गटारात पडलेल्या चिमुकल्याचा शोध सुरू; मनपाच्या अधिकाऱ्यांची मिठाची

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 11, 2019 05:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close