सलमान, शाहरुख आणि आलियासह बॉलिवूड कलाकार एकाच थाळीत...

सलमान, शाहरुख आणि आलियासह बॉलिवूड कलाकार एकाच थाळीत...

सध्याच्या स्थितीत लोकं कधी, कशी आणि काय शक्कल लढवतील याचा काही नेम नाही.

  • Share this:

मुंबई, 19 नोव्हेंबर : सध्याच्या स्थितीत लोकं कधी, कशी आणि काय शक्कल लढवतील याचा काही नेम नाही. काही दिवसांपूर्वी परदेशातील एका हॉटेलमध्ये दीपिका पदुकोणच्या नावाचा डोसा मिळत असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता मुंबईतील एका अशीच एक अनोखी संकल्पना साकारली आहे. या हॉटेलमधील डिशेसना बॉलिवूडचा तडका लावण्यात आला आहे. मुंबईतील हिचकी नावाच्या या हॉटेलमध्ये चक्क बॉलिवूड थाळी मिळते आणि या थाळीच नाव आहे 'गोगो तुस्‍सी ग्रेट हो' या थाळीत बॉलिवूड कलाकारांच्या नावाचे पदार्थही मिळतात.

हिचकी रेस्टॉरंटची बॉलिवूड थाळी ‘गोगो तुस्सी ग्रेट हो’ खाल्ल्यावर बॉलिवूडची आठवण आल्याशिवाय राहत नाही. या थाळीत अभिनेत्री परिणीती चोप्राच्या नावानं ‘पनीरिती बटर’ मसाला ही डिश मिळते. एवढंच नाही तर बॉलिवूडच्या इतर कलाकरांच्या नावावरुनही या ठिकणी पदार्थांना नावं देण्यात आली आहेत.

मुंबईतील या हॉटेलमध्ये शाहरुख खान नावावर ‘शाहरुख नान’ मिळतं. तर सलमान खानच्या नावावर ‘सलमान पान’ मिळतं. इतकंच नाही तर अभिनेत्री आलिया भट्टच्या नावाचा ‘आलिया भात’ही इथं मिळतो. याशिवाय इथं मिळणाऱ्या सलाडमध्ये अभिनेत्री कतरिना कैफच्या नावाच्या सलाड मिळतं ज्याचं नाव 'कट रही है ना सलाड' असं ठेवण्यात आलं आहे.

हिचकी रेस्टॉरंटमध्ये प्रियांका चोप्राच्या नावावर एक चटणी सुद्धा मिळते ज्याचं नाव ‘प्रियांका खोपरा चटणी’ असं नाव देण्यात आलं आहे. तर करण जोहरचा कार्यक्रम ‘कॉफी विथ करण’वरुन कॉफीचं नाव ‘कॉफी विथ गरम’ असं ठेवण्यात आलं आहे. याशिवाय इथं ‘अनुपम खीर’ आणि ‘चिकना रनौत मसाला’ सुद्धा मिळतो.

==============================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 19, 2019 08:46 AM IST

ताज्या बातम्या