सलमान खानची हिरोईन अडचणीत, मोठ्या गुन्ह्यात पोलिसांनी पतीला केली अटक

बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या हिरोईनसंदर्भातील मोठी बातमी समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 3, 2019 04:18 PM IST

सलमान खानची हिरोईन अडचणीत, मोठ्या गुन्ह्यात पोलिसांनी पतीला केली अटक

मुंबई, 3 जुलै :  बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या हिरोईनसंदर्भातील मोठी बातमी समोर आली आहे. 'मैंने प्यार किया' फेम अभिनेत्री भाग्यश्रीचा पती आणि उद्योगपती हिमालय दसानी याला मंगळवारी (2 जुलै) आंबोली पोलिसांनी अटक केली होती. जुगाराचं रॅकेट चालवल्याचा आरोप दसानीवर करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दसानीविरोधात अटकेची कारवाई केली आहे. सध्या त्याची जामीनावर सुटकादेखील झाली आहे. दरम्यान, यांसदर्भात अद्यापपर्यंत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. भाग्यश्रीनं 1990 साली हिमालयसोबत लग्न केलं होतं. बॉलिवूड करिअरच्या उत्तुंग शिखरावर असतानाच भाग्यश्रीनं हिमालयसह लग्नगाठ बांधली.  भाग्यश्रीनं 'मैंने प्यार किया' सिनेमाद्वारे 1989 साली बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. या सिनेमात सलमान खान मुख्य हिरोच्या भूमिकेत होता.

(पाहा :VIDEO: एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं...लोकांनी हंबरडा फोडला)

Loading...

भाग्यश्री आणि हिमालय एकमेकांना शाळेपासूनच ओळखत होते.  त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. यानंतर दोघांनीही 1990 साली लग्न करण्याचा निर्णय घेतला. भाग्यश्री आणि हिमालयला दोनं मुलं आहेत. अभिमन्यू आणि अवंतिका अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत. दरम्यान, लवकरच अभिमन्यू बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे.

(पाहा :धक्कादायक! ड्रेनेजमध्ये सापडली 300 डेबिट कार्ड, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या)

VIDEO: मी सर्वात नालायक आमदार', खडसेंच्या भाषणाने सत्ताधारी गोटात खळबळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2019 04:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...