• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • राज कुंद्राला पुन्हा एकदा High Courtचा झटका; आणखी खावी लागणार तुरुंगाची हवा

राज कुंद्राला पुन्हा एकदा High Courtचा झटका; आणखी खावी लागणार तुरुंगाची हवा

राजने मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल केला होती. मात्र ती याचिका कोर्टाने फेटाळली आहे.

 • Share this:
  मुंबई 7 ऑगस्ट : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा (Raj Kundra)  सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. अश्लील चित्रफिती प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. नुकतीच कोर्टाची सुनावनी झाली असून  कोर्टाने राजची याचिका फेटाळली आहे. 19 जुलैला राजला अटक झाली होती. पण त्यानंतर राजने ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता. यासंदर्भात त्याने मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल केला होती. मात्र ती याचिका कोर्टाने फेटाळली आहे. मुंबई क्राईम ब्रँचकडून (Mumbai Crime Branch) राजला झालेली अटक ही बेकायदेशीर असल्याचं राजच्या वतीने सांगण्यात आलं होतं. त्यासाठी त्याने हाय कोर्टात धाव घेत आव्हान दिलं होतं. 2 ऑगस्टला कोर्टाने हा निर्णय राखून ठेवला होता. मात्र आज त्यावर नाल देण्यात आला. जस्टिस एएस गडकरी यांनी निकाल देत म्हटलं की, मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट द्वारे ताब्यात घेणं कायद्याला अनुसरून आहे. यात कोणत्याही हस्तक्षेपाची गरज नाही. तेव्हा आता राजला आणखी काही काळ जेलमध्येच राहाव लागणार आहे. राज कुंद्राकडून दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे की, त्याला चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली. तर पोलिसांनी सांगितलं की, राजने सीआरपीसी कलम 41 (ए) वर सही करण्यास नकार दिला त्यामुळे त्याला अटक करण्यात आली.

  'तुझ्यात जीव रंगला' फेम राणा दिसणार नव्या भूमिकेत; या मालिकेत झळकणार हार्दिक जोशी

  दरम्यान नुकतीच अभिनेत्री शर्लिन चोप्राचाही (Sherlyn Chopra) चोकशी करण्यात आली. जवळपास 8 तास तिची कसून चौकशी करण्यात आली. त्यात तिने अनेक खळबळजनक दावे देखील केले आहेत. याशिवाय  अभिनेत्री गहना वशिष्ठलाही (Gehana Vashishtha) पोलिसांनी काही दिवसांपूर्वी चौकशीसाठी बोलवलं होतं.
  Published by:News Digital
  First published: