Home /News /entertainment /

Manju Singh Death: 'गोलमाल'ची 'रत्ना' काळाच्या पडद्याआड, हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन

Manju Singh Death: 'गोलमाल'ची 'रत्ना' काळाच्या पडद्याआड, हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन

हिंदी सिनेमा आणि टेलिव्हिजन जगतातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. ‘गोलमाल (Gol Maal)’ मधील 'रत्ना' म्हणजे अभिनेत्री मंजू सिंह (Manju Singh) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

    मुंबई, 16 मार्च: हिंदी सिनेमा आणि टेलिव्हिजन जगतातून एक दु:खद बातमी समोर आली आहे.  ‘गोलमाल (Gol Maal)’ मधील 'रत्ना' म्हणजे अभिनेत्री आणि निर्माती मंजू सिंह (Manju Singh) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. 15 एप्रिल रोजी शुक्रवारी (Manju Singh Death) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेता, गायक-गीतकार आणि पटकथा लेखक स्वानंद किरकिरे (Swanand Kirkire Twitter) यांनी ट्वीट करत मंजू सिंह यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मंजू सिंह यांचे निधन टेलिव्हिजन आणि सिनेमा जगतासाठी मोठा धक्का आहे. मीडिया अहवालानुसार हृदयविकाराच्या झटक्यामुळे मुंबईमध्ये त्यांचे निधन झाले. स्वानंद किरकिरे यांनी मंजू सिंह यांचा फोटो पोस्ट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. स्वानंद किरकिरे यांनी मंजू सिंह यांना श्रद्धांजली अर्पण करताना असे ट्वीट केले आहे की, 'मंजू सिंह आता आपल्यात राहिल्या नाहीत! दूरदर्शनसाठी स्वराज हा शो लिहिण्यासाठी मंजूजींनी मला दिल्लीहून मुंबईत आणले! डीडीसाठी त्यांनी एक कहानी, शो टाईम असे अनेक अनोखे शोज केले. हृषीकेश मुखर्जीच्या गोलमाल मधील 'रत्ना', आमच्या लाडक्या मंजू जी तुमचे प्रेम कसे विसरता येईल... गुडबाय!' स्वानंद किरकिरे यांनी आणखी एक ट्वीट केले आहे. ज्यामध्ये 'एक कहानी' या शोमधील व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मंजू सिंह यांचा एक खास असा जुना व्हिडीओ आहे. precious ! Manju Singh अशी कॅप्शन देत स्वानंद किरकिरे यांनी हा व्हिडीओ रीट्वीट केला आहे. मंजू सिंह यांनी ऋषिकेश मुखर्जी यांच्या 'गोलमाल' सिनेमात रत्ना ही भूमिका साकारली होती. त्यांना प्रेमाने अनेकजण 'दीदी' म्हणायचे. त्यांनी लहान मुलांसाठी असणारा शो 'खेल खिलौने'चे अँकरिंग देखील केले होते. त्यांनी ‘स्वराज’, ‘एक कहानी’, ‘शो टाइम’ यासारख्या एकापेक्षा एक कार्यक्रमांची निर्मिती केली होती. त्यांच्या कार्यक्रमातून सामाजिक आणि सांस्कृतिक मुद्दे विशेषत: मांडले जायचे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Bollywood, Death, Heart Attack

    पुढील बातम्या