'श्री अधिकारी ब्रदर्स'चे संस्थापक गौतम अधिकारी यांचं निधन

 'श्री अधिकारी ब्रदर्स'चे संस्थापक गौतम अधिकारी यांचं निधन

सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि याच दरम्यान त्यांचं निधन झालं.त्यांच्यांवर अंत्यसंस्कार विले पार्ले इथं केले जातील असं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे.

  • Share this:

27 ऑक्टोबर:  दुरदर्शनच्या विश्वातील सर्वात प्रसिद्ध प्रॉडक्शन हाऊस 'श्री अधिकारी ब्रदर्स' चे संस्थापक गौतम अधिकारी यांच निधन झालं आहे. ते 67 वर्षांचे होते.

सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि याच दरम्यान त्यांचं निधन झालं.त्यांच्यांवर  अंत्यसंस्कार  विले पार्ले इथं केले जातील असं त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं आहे.

गौतम अधिकारी हे हिंदी टेलिव्हीजन व्यतिरिक्त मराठी टेलिव्हीजन उद्योगातही अतिशय सक्रिय होते.गौतम आणि त्यांचे भाऊ मार्कंड यांनी 1985 साली 'श्री अधिकारी ब्रदर्स ग्रुप'ची स्थापना केली होती. 1995 मध्ये बीएसई लिस्टमध्ये सामील झाल्यावर, भारताची ही पहिली सार्वजनिक लिस्टेड टेलिव्हीजन बनली. या कंपनीने सुरूवातीला मराठी भाषेत मालिका बनवल्या, आणि नंतर ते सिनेमा वितरण आणि बांधकाम व्यवसायात देखील उतरले.

गौतम अधिकारी यांचा बिझनेस आर्ट्समध्ये डिप्लोमा झाला होता.  त्यांनी अनेक सिनेमा व मालिकांमध्ये दिग्दर्शन  देखील केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2017 04:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading