मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Mumbai Drug case: एनसीबीचं पथक शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर

Mumbai Drug case: एनसीबीचं पथक शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर

मन्नत बंगल्यावर एनसबीची टीम पोहोचली

मन्नत बंगल्यावर एनसबीची टीम पोहोचली

NCB team at Shah Rukh Khan residence Mannat: मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खान अटकेत असताना आता एनसीबीची टीम शाहरुख खानच्या घरी पोहोचली.

  • Published by:  Sunil Desale
मुंबई, 21 ऑक्टोबर : मुंबई ड्रग्ज प्रकरणात (Mumbai drug case) आर्यन खानला (Aryan Khan) एनसीबीने (NCB) अटक केली आहे. त्याच दरम्यान आता एनसीबीची एक टीम अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) मुंबईतील मन्नत (Mannat) या निवासस्थानी दाखल झाली. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानच्या मन्नत निवासस्थानी जवळपास अर्धा तास एनसीबीची टीम उपस्थित होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आमचा तपास सुरू आहे, साक्षीदार आणि संशयित दोघांनाही चौकशीसाठी बोलावले जाते. मन्नतमध्ये कोणालाही चौकशीसाठी नोटीस देण्यात आलेली नाहीये. हा एक तपास प्रक्रियेचा भाग आहे. दरम्यान आज बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) भेटण्यासाठी आर्थर जेलमध्ये पोहोचला होता. यावेळचे शाहरुखचे काही व्हिडीओ आणि फोटो देखील समोर आले होते. शाहरुख खान आणि आर्यन यांच्यात जवळपास 15 ते 20 मिनिटे चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. क्रूझ ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानच्या मुलाचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. कोर्टाने त्याचा जमीन काल पुन्हा फेटाळून लावला आहे. आर्यन खानचा जामीन काल न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याच्या वकिलांनी मुंबई हाय कोर्टात धाव घेतली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी या तिघांच्या जामिनावर सुनावणी ठेवली आहे. वाचा : 'गेल्या वर्षभरातील NCB च्या 90 टक्के केस Fake, खंडणी वसूल करण्याचा डाव आहे' नवाब मलिकांचा गंभीर आरोप आर्यन खान अटकेचा घटनाक्रम 2 ऑक्टोबरला क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक 3 ऑक्टोबर रोजी एनसीबी कोठडीत रवानगी करण्यात आली 4 ऑक्टोबर - पुन्हा 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडीत ठेवण्याचा निर्णय आला. 7 ऑक्टोबर - पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी 10 ऑक्टोबर - नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले 14 ऑक्टोबर - न्यायालयाने निकाल 20 ऑक्टोबर पर्यंत राखून ठेवला 20 ऑक्टोबर - न्यायालयाने आर्यन खानचा जामीन फेटाळला बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रीच्या घरावर NCB चा छापा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे (NCB Raid at Ananya Pandey's Resident) हिच्या घरावर एनसीबीने गुरुवारी छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, NCB ला क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात शाहरुखच्या मुलासोबत बॉलिवूडच्या या यंग जनरेशनमधील अभिनेत्रीचेही चॅट आढळून आले आहे. NCB च्या हाती लागलेल्या चॅटमध्ये तो या अभिनेत्रीसोबत ड्रग्जबाबत चर्चा करताना आढळले आहे. एनसीबीने ते पुरावे म्हणून न्यायालयासमोर सादर केले आहे. असेही म्हटले जात आहे की अभिनेत्री क्रूझवर उपस्थित होती आणि सुरुवातीला एनसीबीने तिला जाऊ दिले.
First published:

Tags: Shah Rukh Khan

पुढील बातम्या