नालासोपारा ते अमेरिका...! भारतीयांचा America got talent मध्ये पुन्हा एकदा डंका

नालासोपारा ते अमेरिका...! भारतीयांचा America got talent मध्ये पुन्हा एकदा डंका

पाहा नालासोपाराच्या या मुलांनी अमेरिकालाही कसं वेड लावलंय...

  • Share this:

मुंबई, 12 फेब्रुवारी : स्टार प्लसवरील डान्स रिअलिटी शो 'डान्स प्लस'च्या पहिल्या सीझनचे विजेते वी अनबिटेबल ( V Unbeatable) 2017 पासून अमेरिका गॉट टॅलेन्ट ( America got talent) या शोमध्ये सध्या डंका पिटत आहे. या डान्स ग्रुपने आतापर्यंत अनेक डान्स शोमध्ये परफॉर्मन्स करत प्रेक्षकांना वेड लावलंय.

मुंबईच्या नालासोपारा मधील एरोबिक डान्स ग्रुप 'वी अनबिटेबल'ने 'अमेरिका गॉट टॅलेन्ट' शोमध्ये मंगळवारी दिलेल्या परफॉर्मन्सनं सर्वांना जागीच खिळवून ठेवलं. या ग्रुपचा परफॉर्मन्स बघून जज आणि प्रेक्षक थक्क झाले होते. मागच्या वर्षी हा ग्रुप अमेरिका गॉट टॅलेंटमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी ते या रिअलिटी शोमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिले होते.

'दिल्लीकरांनी जनतेच्या मनातली गोष्ट सांगितली', अवधुत गुप्तेची भाजपला कोपरखळी

वी अनबिटेबल ग्रुपने रजनीकांतच्या ‘माराना मास’ या गाण्यावर परफॉर्म केलं. या ग्रुपचा जोश बघून परफॉर्मन्स अखेर जजेसकडून त्यांना स्टँडिंग ओवेशनही मिळाली. अमेरिका गॉट टॅलेन्टचे जज हॉवी मंडल यांनी परफॉर्मन्स बघितल्यानंतर ट्विट केले की, ‘इतर ग्रुपच्या तुलनेत तुमच्या ग्रुपमध्ये अधिक उत्साह आहे. तुम्ही तुमच्या परफॉर्मन्समुळे संपूर्ण जगाचे दरवाजे तुमच्यासाठी खुले झाले आहेत आणि तुमच्यामुळे आता आमच्यासाठीही ते दरवाजे खुले झालेत.’

बॉलिवूडमध्ये नक्की काय चाललंय? गणेश आचार्यनंतर आता अभिनेत्यावर गुन्हा दाखल

2017 पासून वी अनबिटेबल ग्रुप अमेरिका गॉट टॅलेन्टमध्ये सहभागी होत आहे. केवळ अमेरिका गॉट टॅलेन्टमध्येच नाही तर देशभरातील विविध डान्स शोमध्ये ते सहभागी होत आहेत आणि भारताचा झेंडा फडकवत आहेत. याशिवाय या ग्रुपच्या सदस्यांनी 'ABCD 2' मध्येही परफॉर्म केलं होतं.

कल्किनं 17 तास प्रसुती कळा सहन केल्यावर घेतला होता धक्कादायक निर्णय, पण...

First published: February 12, 2020, 4:01 PM IST

ताज्या बातम्या