• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Big News : आईच्या वाढदिवशी घरी जाऊ शकणार का आर्यन खान? मुंबई कोर्टाचा मोठा निर्णय

Big News : आईच्या वाढदिवशी घरी जाऊ शकणार का आर्यन खान? मुंबई कोर्टाचा मोठा निर्णय

आर्यन खान याच्या पाठिंब्यासाठी बॉलिवूडमधील अनेक स्टार समोर आले आहेत.

 • Share this:

  मुंबई, 8 ऑक्टोबर : क्रूझ शिपवरील ड्रग्ज पार्टी (Drugs Party) प्रकरणातील आरोपी आर्यन खान (Aryan Khan) आणि त्यांच्या मित्रांच्या जामीनासाठी (No bail) मोठे प्रयत्न केले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आर्यन खान त्याच्या मित्रांसह NCB च्या ताब्यात आहे. गुरुवारी (7 ऑक्टोबर) या प्रकरणात आर्य़न खान याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज आर्यन खानचे वकिल सतीश मानशिंदे (Aryan Khans Lawyer Satish Manshinde) यांच्याकडून आर्यनच्या जामीनासाठी कोर्टात प्रयत्न केला जात होता. मात्र कोर्टाने त्याचा जामीन (Mumbai Court rejects bail applications of Aryan Khan) अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे पुढील 14 दिवस आर्यनला न्यायालयीन कोठडीत राहावं लागणार आहे. आज आर्यन खान याची आई आणि शाहरूख खान याची पत्नी गौरी खान हिचा वाढदिवस आहे. त्यामुळे आज तो घरी येणार अशी अपेक्षा केली जात होती. मात्र कोर्टाने आर्यन खानसह त्याच्या मित्रांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. हे ही वाचा-Aryan Khan च्या अटकेनंतर सुहानाची पहिलीच पोस्ट; आई गौरी खानसाठी लिहिला हा मेसेज ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला आर्यन खान याला गेल्या गुरुनारी कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत पाठवलं होतं. मात्र काल गुरुवारी त्यांना तुरुंगात पाठविण्यात आलं नाही, तर त्याला एनसीबीच्या कोठडीच ठेवण्यात आलं. कारण तुरुंगात पाठविण्यापूर्वी आरोपीची कोविड टेस्ट केली जाते, आणि अद्याप त्याची कोविड चाचणी झाली नव्हती. आर्यन खान आणि त्याच्यासोबत अटक केलेल्या 7 जणांची एनसीबीची कस्टडी काल समाप्त झाली आहे. एनसीबीने त्यांची कस्टडी वाढविण्याची मागणी केली होती, मात्र कोर्टाने एनसीबीची अपील मान्य केली नाही आणि आर्यन खानसह सर्व 8 आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवलं. ज्यानंतर आर्यन खान आणि त्याच्या मित्रांच्या वकिलांकडून जामीन अर्ज करण्यात आला होता. आज ज्यावर सुनावणी झाली.

  Published by:Meenal Gangurde
  First published: