मुंबई 8 सप्टेंबर : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला (Salman Khan) मुंबई सिव्हील कोर्टाने दिलासा दिला आहे. सलमान खानच्या केसवर आधारीत ‘सेलमॉन भॉई’ (Selmon Bhoi) नावाचा एक ऑनलाईन गेम आला होता. त्यावर आता कोर्टाने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायाधीश के. एम. जायसवाल (K M Jaiswal) यांनी या गेमवर निर्णय देत बंदी घातली आहे.
दरम्यान अभिनेता सलमान खानने या गेमविरोधात कोर्टात धाव घेतली होती. तर आता त्याला कोर्टाकडून दिलासा देखील मिळाला आहे. सोशल मीडियावर सलमान खानला सेलमॉन भॉई असं म्हणत अनेकदा मीम्सही व्हायरल केले जायचे. तर त्यावरच गेमही तयार करण्यात आला होता. सलमानच्या हिट अँड रन केसवर आधारीत हा गेम होता.
सलमानच्या वकिलांनी सांगितलं होतं की, या गेममुळे सलमानच्या प्रतिमेला धक्का लागला आहे. त्यानंतर कोर्टाने निर्यण देत तात्काळ या गेमवर बंदी आणली आहे. गेम बनवणारी कंपनी पॅरोडी स्टूडियोज प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याचे डिरेक्टर्स यांना गेम प्रसारित करण्यावर बंदी घातली आहे.
कोर्टाने गेमच्या निर्मात्यांना तात्काळ गुगल प्लेस्टोरवरून हा गेम हटवण्यास सांगितल आहे. कोर्टाने सांगितलं की, गेम आणि त्यातील चित्र ही अभिनेता सलमान खानशी मिळती जुळती आहेत. याशिवाय ती सलमानच्या हिट अन्ड रन केससी संबधीत आहेत. याशिवाय कोर्टाने म्हटलं की, अभिनेता सलमान खानने कधीही हा गेम बनवण्यास परवानगी दिली नव्हती.
त्यामुळे सलमानवरील हा गेम आता काढून टाकण्यात येणार आहे. याशिवाय लवकरच सलमानचा अंतिम हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच त्यांच पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
Published by:News Digital
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.