रिपोर्ट्सनुसार, पीडित व्यक्ती आपल्या कामावरुन घरी परतत होता त्यावेळी तो दारूच्या नशेत होता. दारूच्या नशेत असलेला हा व्यक्ती रस्ता ओलांडत असताना रजत बेदी याच्या कारची त्याला धडक बसली. या अपघातात हा व्यक्ती जखमी झाला. या अपघातानंतर पीडित व्यक्तीला रजत बेदीने रुग्णालयात दाखल करुन यासंदर्भात त्याच्या कुटुंबाला आणि पोलिसांनाही माहिती दिली. तसेच पीडित कुटुंबाला मदतीचे आश्वासनही दिले. मात्र, तो पुन्हा पीडित व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबाला भेटायला गेलाच नाही असे मिड्डे ने आपल्या वृत्तात म्हटले आहे. पीडित व्यक्तीच्या परिवारात पत्नी आणि दोन मुली आहेत. एका मुलीचे वय 13 वर्षे तर दुसऱ्या मुलीचे वय 7 वर्षे आहे.Mumbai: Case registered against actor Rajat Bedi in DN Nagar PS for allegedly hitting a person with his car in Andheri area
The actor brought the injured to Cooper hospital, where he (actor) told he had hit the victim with his car. Victim admitted to hospital: DN Nagar police — ANI (@ANI) September 7, 2021