अभिनेत्रीनं मुंबईतील राहत्या घरी घेतला गळफास, आत्महत्येपूर्वी केलं Facebook Live

अभिनेत्रीनं मुंबईतील राहत्या घरी घेतला गळफास, आत्महत्येपूर्वी केलं Facebook Live

मिळालेल्या माहितीनुसार अनुपमाच्या फ्लॅटमधून एक सुसाइड नोटही मिळाली आहे.

  • Share this:

मुंबई, 07 ऑगस्ट : गेल्या काही दिवसांपासून कलाकारांच्या आत्महत्येच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सुशांत सिंह नंतर टीव्ही अभिनेता आणि मॉडेल समीर शर्मानं आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता आणखीन एका अभिनेत्रीनं मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठकने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 40 वर्षांच्या अनुपमाच्या अशा अचानक एक्झिटनं मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. अनुपमाने आत्महत्येच्या एक दिवस आधी फेसबुक लाईव्ह केलं होतं.

फेसबुक लाईव्हमध्ये अनुपमाने आपल्या फॅन्ससोबत मनातल्या गोष्टी शेअर केल्या. 'कोणावरही विश्वास ठेवू नये, माझी खूप मोठी फसवणूक करण्यात आली आहे. 'असं त्यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये सांगितलं

हे वाचा-SSR Death प्रकरणी मोठी घडामोड, बिहार IPS तिवारींना 2 दिवसात मुंबई सोडण्याचे आदेश

मिळालेल्या माहितीनुसार अनुपमाच्या फ्लॅटमधून एक सुसाइड नोटही मिळाली आहे. तिने या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, "मित्राच्या विनंतीवरून मी मालाडच्या विज्डम प्रोड्यूसर कंपनीत 10 हजार रुपये गुंतवले होते. नियमानुसार 2019 रोजी कंपनीने मला हे पैसे पुन्हा मिळणं अपेक्षित होतं. कंपनीकडून हे पैसे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. मनीष झा नावाच्या व्यक्तीचा तिने सुसाईड नोटमध्ये उल्लेखही केला आहे.

10 हजार रुपयांसाठी अनुपमानं हे पाऊल उचललं का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. मागच्या महिन्यापासून अनेक कलाकारांनी आत्महत्या केल्याच्या घटनेनं मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 7, 2020, 8:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading