मुंबई, 27 जानेवारी : एकीकडे काँग्रेसकडून बाॅलिवडूच्या कलाकारांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. तर दुसरीकडे बाॅलिवूडची 'खल्लास गर्ल' ईशा कोप्पीकर भाजपमध्ये दाखल झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ईशाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ईशाकडे महिला आणि वाहतूक संघटनेच्या रस्ते वाहतूक सुरक्षेच्या ब्रॅंड अॅम्बेसेडरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ईशाने आपल्या कारकिर्दीला 1968 साली ईशान तमिळ सिनेमा 'काढ़ल कविताई' ने सुरुवात केली होती. या सिनेमासाठी ईशाला फिल्म फेअर अॅवॉर्डही मिळाला होता.
ईशाने 2000 मध्ये 'फिजा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. त्यानंतर ईशाने 'डॉन', 'सलाम-ए-इश्क', 'क्या कूल हैं हम', 'हम तुम' सारख्या चित्रपटात भूमिका साकारली होती.
================================