मुंबई 1 मे: कोरोना विषाणूचं (COVID 19) संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान प्रसिद्ध मराठी अभिनेते किरण माने (Marathi actor Kiran Mane) यांना कोरोनाची लागण झाली आहे. ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या मालिकेच्या निमित्तानं ते गुजरातला गेले होत. तिथंच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
“अनपेक्षितपणे मलाही गाठलं त्यानं. गुजरातमधून माझ्या माणसांत आलोय. सातार्यात देवासारखी माणसं जोडली, ती मनापासून काळजी घेतायत. तुमचं प्रेम राहूद्यात सोबत.. चुटकीसरशी ‘निगेटिव्ह’ होऊन दाखवतो ! एकाकीपणात तुमची साथ मोलाची असेल” अशी फेसबुक पोस्ट करुन किरण माने यांनी कोरोना झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. त्यांची ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
कसं केलं जातं तरुणींचं शोषण?; ईशा अग्रवालनं केली बॉलिवूडची पोलखोल
‘असा मेसेज आल्यास व्हा अलर्ट’; आर. माधवन यानं देशवासीयांना केलं सावध
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळं अनेक चित्रपट आणि मालिकांचं चित्रीकरण आता महाराष्ट्राबाहेर केलं जात आहे. यामध्ये काही मराठी मालिका देखील आहेत. यापैकीच एक मुलगी झाली हो या मालिकेच शूटिंग सध्या गुजरातमध्ये सुरु आहे. याच ठिकाणी माने यांना कोरोनाचा संसर्ग झाला. या मालिकेत ते मुख्य व्यक्तिरेखा साकारत आहेत. त्यामुळं त्यांच्या अनुपस्थितीत शूटिंग कसं करणार? हा मोठा प्रश्न निर्मात्यांना पडला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Corona updates