मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मुलगी झाली हो मालिकेतील अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो आले समोर

मुलगी झाली हो मालिकेतील अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो आले समोर

स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेतील अभिनेत्री रविवारी 19 डिसेंबर 2021 रोजी लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 20 डिसेंबर-स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेतील अभिनेत्री रविवारी 19 डिसेंबर 2021 रोजी लग्नबंधनात अडकली आहे. मुलगी झाली हो या लोकप्रिय मालिकेतील आर्या म्हणजेच अभिनेत्री श्वेता अंबिकरने (shweta ambikar wedding photos)   दिग्दर्शक अमेय गोरे (ameya gore)   याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. या दोघांच्या लग्नाचे काही फोटो समोर आले आहेत.

अभिनेत्री श्वेता अंबिकर आणि अमेय गोरेने लग्नाचे फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे, चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. काही दिवसांपूर्वी श्वेताने केळवण साजरे झाल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या दोघांच्या लग्नाला अजय-अतुल या संगीत विश्वातील लोकप्रिय जोडीने देखील हजेरी लावली.

वाचा-कोरोनामुळे करीनाला तैमूरचा बर्थडे करता येणार नाही साजरा, पोस्ट करत..

ललित कला केंद्र मध्ये श्वेताची अमेय गोरे याच्यासोबत मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले.  अमेय आणि श्वेता यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची ओळख आहे. अमेय स्वतः लेखक आणि दिग्दर्शक आहे. यासोबतच त्याने काही नाटकांमधून अभिनय देखील साकारला आहे. शिवाय तो स्वतःची एक नाट्य अकॅडमी चालवत आहे.

श्वेता अंबिकर ही मूळची पुण्याची आहे. अभिनयाची आवड असलेल्या श्वेताने ललीतकला केंद्र मधून अभिनयाचे धडे गिरवले आहेत.नाटकांतून काम करत असताना श्वेताने माझे मन तुझे झाले या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.

वाचा-'आई कुठे काय..' फेम संजनाच्या ग्लॅमरस लुकने सोशल मीडियावर लावली आग

दुर्वा, दिल दोस्ती दुनियादारी, स्वराज्यरक्षक संभाजी, बाजी या मालिकांमधून महत्वाच्या भूमिका साकारण्याची संधी तिला मिळत गेली. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील तिने साकारलेल्या छोट्या राणूअक्का असो वा दिल दोस्ती दुनियादारी मालिकेतील रेवा या भूमिकांमुळे श्वेताला नवी ओळख मिळाली. आता तिची मुलगी झाली हो मालिकेतील भूमिका देखील प्रेक्षकांना आवडत आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, TV serials