मुंबई,16 जानेवारी- गेल्या दोन दिवसांपासून अभिनेते किरण माने
(Kiran Mane) प्रचंड चर्चेत आहेत. राजकीय भूमिका घेतल्याने आपल्याला 'मुलगी झाली हो'
(Mulgi Zali Ho) मालिकेतून काढून टाकलं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.सर्वच स्तरातून आता प्रतिक्रिया येत आहेत. या घडलेल्या गोष्टीचा प्रचंड निषेध होत आहे.
किरण माने फेसबुक पोस्ट-
दरम्यान किरण माने यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर
(Kiran Mane Facebook Post) एक पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे. "आपली तुफानी मोहीम पाहून, घाबरुन जाऊन प्राॅडक्शन हाऊसकडून पुढच्या मोठ्या कारस्थानाचा भाग सुरू..... आज मिडीयावाले सेटवर जाणार आहेत...अनेक कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती केली गेलेली आहे... करुद्या आरोप.. जाऊद्या झाडून.. ते बिचारे 'पोटार्थी' हायेत. प्राॅडक्शन हाऊस विरोधात बोलणं त्यांच्या पोटावर पाय आणेल. माझ्यासारखं काढून टाकलं जाईल म्हणून हादरलेत बिचारे... चारेक संघविचारी खरोखर माझ्या विरोधात आहेत.. बाकीच्यांवर मनाविरूद्ध जाऊन माझ्या विरोधात बोलावं लागणार.. तरीही ज्यांच्या पाठीचा कणा मजबूत आहे, ते 'सत्य' सांगतीलच ! पण दोस्तांनो, असल्या भंपकपणावर इस्वास ठेऊ नका. मराठीत लोटांगन घालनारे आनी लाळघोटे कलाकार ढीग आहेत. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, हे तुमी ठरवा !मी बी कंबर कसलेली हाय..कच्च्या गुरूचा चेला नाय मी !तुका म्हणे रणी...नये पाहो परतोनी" !!!- किरण माने. असं म्हणत त्यांनी निर्मात्यांवर पुन्हा निशाणा साधला आहे.
या पोस्टमधून किरण माने यांनी थेट निर्मात्यांवर निशाणा साधला आहे. निर्मिती संस्था आपल्याविरुद्ध मोठा कारस्थान करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. इतकंच नव्हे तर मालिकेच्या सेटवर असणाऱ्या त्यांच्या इतर सहकलाकारांना त्यांच्याविरुद्ध बोलण्याची सक्ती केली गेली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनाही माझ्यासारखं मालिकेतून काढून टाकू नये यासाठी त्यांच्याकडे मनाविरुद्ध जाऊन माझ्याविरुद्ध बोलावं लागणार असल्याचंही त्यांनी आपल्या या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. त्यांची ही पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. सर्वच स्तरातून त्यांना पाठिंबा दिला जात आहे. शिवाय त्यांना न्याय मिळवून दिला जावा अशी मागणीही केली जात आहे.
(हे वाचा:'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अनिता दातेनं किरण माने प्रकरणावर दिली प्रतिक्रिया,)
स्टार प्रवाह वाहिनीवर 'मुलगी झाली हो' ही मालिका आपल्या भेटीला येते. या मालिकेत अभिनेते किरण माने महत्वाची भूमिका साकारत होते. या मालिकेत ते विलास पाटीलच्या भूमिकेत दिसत होते. यांनी मुख्य पात्र असणाऱ्या साजिरीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. प्रेक्षक त्यांना पसंत करत होते. त्यांच्या दमदार अभिनयाचं सतत कौतुकही होत असे. परंतु त्यांना तडकाफडकी मालिकेतून काढून टाकल्यानं सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. नुकताच मालिकेचा नवीन पोस्टर समोर आला आहे. या पोस्टरमध्ये फक्त साजिरी आणि शौनक दिसून येत आहेत. या पोस्टरमधून किरण माने यांना वगळण्यात आल्याचं दिसून येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.