Home /News /entertainment /

‘मुलगी झाली हो’ मालिकेतील कलाकारांच्या एका गटाने किरण मानेंवर केले गंभीर आरोप तर दुसऱ्या गटाने केली पाठराखण

‘मुलगी झाली हो’ मालिकेतील कलाकारांच्या एका गटाने किरण मानेंवर केले गंभीर आरोप तर दुसऱ्या गटाने केली पाठराखण

राजकीय भूमिका मांडल्याने 'मुलगी झाली हो' (Mulgi Zali Ho) या मालिकेतील अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना काढून टाकण्यात आलं असल्याची सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे. आता यानंतर मालिकेतील काही कलाकारांनी समोर येत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तर काही महिला कलाकारांनी त्यांची पाठराखण करत त्यांना पाठींबा दिला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 16 जानेवारी-मागच्या काही दिवसांपासून किरण माने यांच नाव सगळीकडे चर्चेत आहे. राजकीय भूमिका मांडल्याने 'मुलगी झाली हो' (Mulgi Zali Ho) या मालिकेतील अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना काढून टाकण्यात आलं असल्याची सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे. किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप देखील केले होते. त्यांना सर्व स्तरांतून समर्थन मिळत आहे. स्टार प्रवाह वाहिनीने पत्रक जाहीर करत किरण मानेंवर गंभीर आरोप लावले आहेत. आता यानंतर मालिकेतील काही कलाकारांनी किरण माने यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. तर मालिकेतील काही कलाकारांनी किरण माने यांना पाठींबा दर्शवला आहे. आता या प्रकरणामुळे मालिकेच्या सेटवरच दोन गट पडल्याचे दिसून येते आहे. टीव्ही 9 मराठीला मुलगी झाली हो मालिकेतील काही कलाकारांनी मुलाखत देत या प्रकराणावर मत मांडले आहे. यामध्ये दिव्या पुगावकर (माऊ), शर्वरी पिल्लई (विलास यांची पत्नी), सविता मालपेकर (विलासची आई व मुलीची आजी) तसंच मालिकेचे दिग्दर्शक सचिन देव यांनीही किरण मानेंवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच श्वेता आंबिलकर (राजनची मुलगी) हिच्यासह मालिकेतील अन्य काही माहिला कलाकारांनी किरण माने हा माणूस म्हणून किती चांगला आहे, हे सांगत त्यांना पाठींबा दिला आहे. वाचा-' कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची...' किरण मानेंचा निर्मात्यांवर गंभीर आरोप .मालिकेतील मुख्य कलाकार दिव्या पुगावकरनं किरण मानेंवर गंभीर आरोप केले आहेत. ती टीव्ही 9 शी बोलताना म्हणाले, पहिली सुरुवातीचे दिवस ते चांगले वागत होते. मात्र माने हे सतत टोमणे मारायचे आणि अपशब्द वापरायचे. मला वजनावरून टोमणे मारायचे. ते मला म्हणायचे के आपलं नाते बापलेकीचे आहे, मग एकदा बाप आपल्या मुलीबाबत अशी भाषा देखील वापरेल का, असा सवाल देखील तिनं किरण माने यांना यावेळी केला. वाचा-'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अनिता दातेनं किरण माने प्रकरणावर दिली प्रतिक्रिया, सविता मालपेकर टीव्ही 9 शी बोलताना म्हणाल्या की, माझ्याशी तो कधी वाईट वागला नाही. पण तो स्वत:लाचा मालिकेचा हिरो समजत होता. शिवाय माझ्यामुळे मालिका चालत असल्याचे म्हणत होता. शिवाय सेटवरील या मुलींना टोमणे मारत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय त्यांनी सांगितले त्याच्या जाण्याने काय आमचं शुटींग थांबलं नाही. तसेच त्याच्या जाण्याने मालिका देखील बंद पडणार नाही. कारण या मालिकेने अनेकांना कोरोनाच्या काळात रोजगार दिले आहेत. वाचा- किरण माने प्रकरणाला नवं वळण, अभिनेत्यावर वाहिनीकडून गंभीर आरोप यावेळी मालिकेत किरण मानेच्या सूनेची भूमिका साकारणारी अभिनेत्रीने श्वेता आंबिलकर हिनं टिव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, माझं आणि त्यांचे नाते बाप लेकीचं आहे. मी त्यांना या मालिकेत पहिल्यांदाच भेटले. ते माझ्याशी कधीच वाईट वागले नाहीत किंवा अपशब्द वापरले नाहीत. शिवाय ते माणूस म्हणून दिलदार असल्याचे देखील सांगितले. यासोबत मालिकेतील अन्य काही महिला कलाकारंनी देखील किरण माने हे माणूस म्हणून सच्चा असल्याचे सांगत त्यांच्या भूमिकेला पाठींबा दर्शवला.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment, Tv serial

    पुढील बातम्या