• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • VIDEO : साध्या भोळ्या माऊचा स्वत:च्या लग्नात अंजी- पश्यासोबत भन्नाट डान्स!

VIDEO : साध्या भोळ्या माऊचा स्वत:च्या लग्नात अंजी- पश्यासोबत भन्नाट डान्स!

शौनक आणि साजिरीच्या लग्नासाठी (sajiri dance) सहपरिवार सहकुटुंब मालिकेतील अंजी आणि पश्या सोबत मामी देखील पोहचल्या आहेत.

 • Share this:
  मुंबई, 20 नोव्हेंबर- स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ मालिका  (sajiri and shaunak wedding) आता अत्यंत महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेतल्या माऊने आपलं संपूर्ण बालपण वडिलांच्या तिरस्कारामध्ये घालवलं. तिचं तोंड पहाणं हा देखिल अपशकून समजला जायचा. त्याच माऊचा लक्ष्मीच्या पावलांनी सन्मानाने गृहप्रवेश झाला आहे. या लाडक्या लेकीच्या तिरस्कारापायी कुणी तिचं बारसंही केलं नाही. आईने लाडाने माऊ हाक मारली आणि सर्वांचीच ती लाडकी माऊ झाली. मुलगी म्हणून मनापासून स्वीकारल्यानंतर तिच्या वडिलांनी तिचं थाटामाटात बारसं करत साजरी असं नामकरण केलंय. आता हीच साजिरी माप ओलांडून सासरी जायला निघाली आहे. या दोघांच्या लग्नासाठी  (sajiri dance) सहपरिवार सहकुटुंब मालिकेतील अंजी आणि पश्या सोबत मामी देखील पोहचल्या आहेत. स्टार प्रवाह वाहिनीने नुकताच शौनक आणि माऊच्या लग्नाचा एक व्हिडीओ इन्स्टावर शेअर केला आहे. यामध्ये माऊने नऊवारी नेसली आहे व डोक्याला बासिंग आहे. माऊच्या लग्नासाठी सहपरिवार सहकुटुंबमधील अंजी आणि पश्या देखील गेले आहेत. लग्न म्हटलं डान्स आलाच. वाचा : बायकोने केलेल्या मारहाणीच्या आरोपांवर अनिकेत विश्वासरावची पहिली प्रतिक्रिया... अंजीने डान्स करायला सुरूवात केल्यानंतर नवरी मुलगी माऊला देखील राहवत नाही. मग काय अंजीसोबत माऊ देखील ठेका धरते. हळूहळू मामी मग पश्या आणि नंतर नवरा मुलगा शौनक देखील ठेका धरतो. हा भन्नाट डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. साध्या भोळ्या माऊचा हा भन्नाट डान्स पाहून प्रेक्षक मात्र आश्चर्यचकीत झाले आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by Star Pravah (@star_pravah)

  नुकताच शौनक आणि माऊचा संगीत सोहळा पार पडला. आता या दोघांच्या लग्नाला स्टार प्रवाच्या मालिकेतील अनेक प्रसिद्ध चेहरे व लोकप्रिया जोड्या लग्नाला हजेरी लावणार आहेत. आता प्रेक्षकांना माऊ आणि शौनकला एकत्र पाहण्याची व त्यांचा लग्नसोहळा पाहण्याची उत्सुकता लागली आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: