मुंबई, 15 जानेवारी: राजकीय टीका करतो म्हणून स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो ( mulgi zali ho ) या लोकप्रिय मालिकेत अभिनेते किरण माने (kiran mane) यांना काढून टाकण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सर्वच स्तरातून या प्रकाराचा निषेध होत आहे. दरम्यान, किरण माने यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्याच्या या भेटीमुळे या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे.
किरण माने यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे भेट घेतली यावेळी किरण यांना अचानक मालिकेतून काढून टाकल्या बाबत चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. विशिष्ट पक्षाविरोधात लिहिल्यामुळे काढून टाकल्याचा किरण माने यांचा आरोप आहे.
'राजकीय भूमिकेमुळे मालिकेतून काढून टाकलं जातं का?' किरण माने प्रकणावर डॉ. अमोल कोल्हेंचा सवाल
छोट्या पडद्यावरील मुलगी झाली हो (Mulgi Jhali Ho) या मालिकेला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. या मालिकेत अभिनेता किरण माने (Kiran Mane) हे विलास पाटील ही भूमिका साकारत होते. किरण हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. सध्या ते त्यांच्या राजकीय भूमिका सोशल मीडियावर मांडत आहेत.
'ही कोणती झुंडशाही?' मालिकेतून काढल्यानंतर किरण मानेंची पहिली प्रतिक्रिया VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment, शरद पवार