मुंबई, 21 डिसेंबर- स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो (Mulgi Jhali Ho)मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत प्रमुख भूमिकेत असणार अभिनेत्री दिव्या सुभाष पुगावकर (Divya Pugaonkar) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतेच मालिकेत माऊ म्हणजे साजिरीने लग्नगाठ बांधली आहे. आता खऱ्या आय़ुष्यात देखील ती विवाह बंधनात अडकणार आहे. नुकतेच तिनं तिच्या इन्स्टा स्टोरीला टिळक सेरेमनीचे फोटो शेअर केले आहेत. यासोबत काही तिने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओवर अभिनंदन देखील केले आहे.
अभिनेत्री दिव्या सुभाष लवकरच अक्षय घरतसोबत लग्नगाठ बांधणार आहे. तिनं लग्नाची तारीख जाहीर केली नसली तरी तिच्या इन्स्टा स्टोरीवरचे फोटो पाहून तर लवकर लग्नगाठ बांधणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे साजिरी आता रिल नंतर रिअर लाईफमध्ये लग्नगाठ बांधणार असल्याचे नक्की झाले आहे. चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
वाचा-'मी गुलजार यांच्याकडे स्कर्ट मागितला आणि..', नीना यांनी सांगितला 'तो' किस्सा
दिव्याचा होणार नवरा काय करतो?
अक्षय घरत फिटनेस मॉडेल आहे. न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर म्हणूनही त्याची ओळख आहे. अक्षय आणि दिव्या बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. त्यांच्या मैत्रीचे रूपांंतर हळूहळू प्रेमात झाले. दिव्याच्या वाढदिवसादिवशी अक्षयने मालिकेच्या सेटवर जाऊन तिला सरप्राईज दिले होते.
View this post on Instagram
दिव्या पुगावकर हिने ‘मुलगी झाली हो’ या मालिकेआधी ‘प्रेमा तुझा रंग कसा’ आणि ‘विठुमाऊली’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तिला पहिल्यांदाच मुलगी झाली हो या मालिकेत मुख्य भूमिका मिळाली आहे. अनेक संकटांचा सामना केल्यानंतर अखेर साजिरी आणि शौनक यांचे मालिकेत लग्न झाले आहे. दोघांच्या संसाराला देखील सुरूवात झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.