Home /News /entertainment /

'500 भाग पूर्ण करताना अतिशय खडतर क्षण..' मुलगी झाली हो फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

'500 भाग पूर्ण करताना अतिशय खडतर क्षण..' मुलगी झाली हो फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

आज मुलगी झाली हो मालिकेने यशस्वीपणे 500 भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. यानिमित्त मालिकेतल एका अभिनेत्याने एक पोस्ट केली आहे. सध्या त्याची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

  मुंबई, 16 जून- स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Jhali Ho ) ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेतील कथा आणि त्यातील कलाकार यामुळे त्याची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. मध्यला काळात ही मालिका एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आली होती. तेव्हा मालिका निरोप घेणार असल्याची अफवा देखील पसरली होती. पण आज मालिकेने यशस्वीपणे 500 भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. यानिमित्त मालिकेतल एका अभिनेत्याने एक पोस्ट केली आहे. सध्या त्याची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. मुलगी झाली हो मालिकेत साजिरीची भूमिका दिव्या पुगावकर साकारताना दिसते. तर शौनकची भूमिका योगेश सोहनी साकरताना दिसतो. साजिरी आणि शौनकची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. प्रेक्षकांना या दोघांची केमिस्ट्री प्रचंड आवडते. मालिकेत मध्यंतरी अनेक चढउतार आले. या सगळ्यात मालिकेची वेळ बदलली, म्हणजे मालिका दुपारच्या सत्रात दाखवण्यात सुरू झाली. तरी देखील मालिकेला प्रेक्षकांचे चांगले प्रेम मिळत आहे. मालिकेने आज 500 भागाच टप्पा पूर्ण केला आहे. यानिमित्त मालिकेत शौनकची भूमिका साकरणार अभिनेता योगेस सोहनी याने एक खास पोस्ट लिहिली आहे. वाचा-IPS कीर्तीवर आली ट्रॅफिक हवालदार होण्याची वेळ; जीजीआक्का मागणार भररस्त्यात माफी योगेस सोहनीने काय म्हटलं आहे पोस्टमध्ये? योगेस सोहनीने आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आज "मुलगी झाली हो" या माझ्या मालिकेने ५०० भागांचा टप्पा पूर्ण केला. 😊😊 ह्या संपूर्ण प्रवासात काही अत्यंत आनंदचे तर काही अतिशय खडतर असे क्षण आले. या सगळ्या प्रवासात मायबाप रसिक प्रेक्षकांची म्हणजेच तुमची साथ खूप महत्त्वाची होती, या तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे आणि आशिर्वादामुळेच हे शक्य झालं आहे म्हणून तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार 🙏🙏 तुमचा लोभ आहेच तो वृध्दिंगत व्हावा हीच प्रार्थना. 😇😇 योगेशच्या या पोस्टवर चाहत्यांकडून मालिकेतील कलाकारांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
  किरण माने प्रकरण स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या मालिकेतून अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना रातोरात काढून टाकण्यात आल्यामुळं मालिका चांगलीच चर्चेत आली होती. सोशल मीडियावर राजकीय भूमिका घेतल्यानं आपल्याला मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचा आरोप किरण मानेंनी केला होता. मात्र स्टार प्रवाह वाहिनी व मालिकेच्या निर्मात्यांनी त्यांचा हा आरोप धुडकावून लावत त्यांच्या गैरवर्तनामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचं म्हटलं होतं.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या