S M L

...याला गलथानपणा म्हणायचा की उद्दामपणा !, मुक्ताने केला नाट्यगृहाच्या दुरावस्थेचा पर्दाफाश

पुण्यातल्या यशवंत चव्हाण नाट्यगृहाच्या दुरावस्थेबद्दल अभिनेत्री मुक्ता बर्वेनं फेसबुकवर फोटो टाकून वाभाडे काढले आहेत.

Sachin Salve | Updated On: Jul 13, 2017 07:33 PM IST

...याला गलथानपणा म्हणायचा की उद्दामपणा !, मुक्ताने केला नाट्यगृहाच्या दुरावस्थेचा पर्दाफाश

13 जुलै : मोठ्या शहरांतल्या नाट्यगृहांमधला सावळा गोंधळ नवा नाही. पुण्यातल्या यशवंत चव्हाण नाट्यगृहाच्या दुरावस्थेबद्दल  अभिनेत्री मुक्ता बर्वेनं फेसबुकवर फोटो टाकून वाभाडे काढले आहेत.

पुण्यातल्या कोरथरूडच्या यशवंत चव्हाण नाट्यगृहात गेली अनेक महिन्यांपासून स्वच्छता कर्मचारीच नाहीये. त्यामुळे सगळीकडे घाण पसरलीये. याबद्दल कारण विचारलं असता कोणत्या तरी टेंडरवर- कोणाची तरी सही राहिलीये असं कारण सांगितलं जातंय. केवळ नाटकावर प्रेम करणारे रसिक आणि कलाकार मिळाले म्हणून तुम्ही आम्हीला असं गृहीत धरणार का?  असा सवाल मुक्तानं फेसबुकवर पोस्ट टाकून विचारलाय.

साधारण सगळ्या नाट्यगृहांची हिच स्थिती असल्याचंही मुक्तानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. याला गलथानपणा म्हणायचा,बेजबाबदारपणा म्हणायचा की उद्दामपणा!!!!! असा उद्वविग्न सवालही तीनं केलाय.या नाट्यगृहांवर कोट्यवधी रूपये खर्च केले जातात मात्र, त्याच्या देखभालीकडे पूर्ण दुर्लक्ष केलं जातं. कलाकार आणि रसिक मोठ्या प्रेमानं नाटकं आणि इतर कार्यक्रमांसाठी येत असतात. मात्र, साध्या सोई सुविधांकडेही दुर्लक्ष केलं जातं. महापालिका याकडे केव्हा लक्षं देणार असा प्रश्न निर्माण होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 13, 2017 07:33 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close