मुंबई, 31 ऑक्टोबर : बीआर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेतील (Mahabharat) भीष्म पितामह आणि सुपरहिरो शक्तिमान (Shaktimaan) म्हणून घराघरात पोहोचलेले अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) आता वादग्रस्त झाले आहेत. नेहमी ते काही ना काही वादग्रस्त वक्तव्य करत असतात, या अशा वक्तव्यांमुळेच ते नेहमी चर्चेत राहिले आहेत. आधी नेपोटिझबाबत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि आता त्यांनी मी टूबाबत (MeToo) वक्तव्य केलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
महिलांच्या लैंगिक छळाला महिलाच कारणीभूत आहे, असा धक्कादायक आरोप मुकेश खन्ना यांनी केला आहे. फिल्मी चर्चाला दिलेल्या मुलाखतीत मीटूबाबत आपलं मत मांडताना मुकेश खन्ना यांनी महिलांविरोधात वादग्रस्त विधान केलं. मीटूला महिलाच कारणीभूत आहेत. महिला जेव्हा घराबाहेर पडून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालू लागल्या, बोलू लागल्या तेव्हापासूनच मीटूची समस्या निर्माण झाली असं मुकेश खन्ना म्हणाले.
This man is SICK. In short, if women will step out for work, men are entitled to sexually assault them? If women want safety, they should stay at home.
या व्हिडीओत मुकेश खन्ना म्हणतात, "पुरुष वेगळा असतो आणि महिला वेगळी असते. महिलांची आणि पुरुषांची रचना वेगवेगळी असते. घर सांभाळणं हे महिलांचं काम. मीटूची समस्या तेव्हा सुरू झाली जेव्हा महिलांनीही काम करायला सुरुवात केलं. आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बोलतात"
"समस्या इथूनच सुरू होते. सर्वात पहिली व्यक्ती जी याला तोंड देतो ती म्हणजे घरातील मूल. ज्याला आई भेटत नाही. आयासोबत बसून ते क्योंकी सास भी कभी बहू पाहत असतं. हे जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून मीसुद्धा तेच करणार जे पुरुष करतात याची सुरुवात झाली. नाही, पुरुष पुरुष आहे आणि महिला महिला आहे", असं ते म्हणाले.
मुकेश खन्ना यांचा हा व्हिडीओ कधीचा आहे हे माहिती नाही. मात्र तो सोशल मीडियावर व्हायरल होताच, तो पाहून नेटिझन्सचा संताप उडाला आहे. त्यांनी या व्हिडीओवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुकेश खन्ना यांना त्यांच्याच महाभारत आणि शक्तिमान मालिकेतील त्यांच्या सहकलाकार महिलांची आठवण करून दिली.