"माझ्याइतका महिलांचा सन्मान कुणीच करत नसावा", वादग्रस्त VIDEO नंतर मुकेश खन्ना यांचं स्पष्टीकरण

MeToo बाबत आपली भूमिका मांडताना मुकेश खन्ना (Mukesh khanna) यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केलं. ज्यामुळे त्यांनी नेटिझन्स आणि अभिनेत्रींनी चांगलंच धारेवर धरलं.

MeToo बाबत आपली भूमिका मांडताना मुकेश खन्ना (Mukesh khanna) यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केलं. ज्यामुळे त्यांनी नेटिझन्स आणि अभिनेत्रींनी चांगलंच धारेवर धरलं.

  • Share this:
    मुंबई, 02 नोव्हेंबर : बीआर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेतील (Mahabharat) भीष्म पितामह आणि सुपरहिरो शक्तिमान (Shaktimaan) म्हणून घराघरात पोहोचलेले अभिनेते मुकेश खन्ना  (Mukesh Khanna) यांनी मीटूबाबत  (MeToo) आपली भूमिका मांडताना महिलांबाबत वादग्रस्त विधान केलं. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि नेटिझन्सनी त्यांना ट्रोल केलं. अनेक अभिनेत्रींनी त्यांना चांगलंच सुनावलं. दरम्यान आता या व्हायरल व्हिडीओबाबत मुकेश खन्ना यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पुरुष पुरुष असतो, महिला महिला असते. महिला घराबाहेर पडून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागल्या, तेव्हाच मीटूची समस्या निर्माण झाली, असं वक्तव्य केल्यानंतर मुकेश खन्ना यांच्यावर टिकेचा भडीमार झाला. त्यानंतर त्यांनी आता  आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला नवा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओसह त्यांनी भलीमोठी पोस्टही लिहिली आहे. आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. आपल्याइतका महिलांचा सन्मान कुणीच करत नसावा असं ते म्हणाले.
    View this post on Instagram

    मुझे सचमुच हैरानी हो रही है कि मेरे एक स्टेट्मेंट को बहुत ही ग़लत तरीक़े से लिया जा रहा है। मुझे औरतों के ख़िलाफ़ बताया जा रहा है। जितनी इज़्ज़त मैं नारियों की करता हूँ शायद ही कोई करता होगा। इसीलिए मैंने LAXMI BOMB नाम का विरोध किया। मैं नारियों की सुरक्षा को लेकर चिंतित हूँ। हर रेप कांड के ख़िलाफ़ मैं बोला हूँ।मेरे एक इंटर्व्यू की क्लिपिंग को लेकर कुछ लोगों ने शोर मचा दिया है। मैंने कभी नहीं कहा कि औरतों को काम नहीं करना चाहिए। मैं सिर्फ़ ये बताने जा रहा था कि Me Too की शुरुआत कैसे होती है। हमारे देश में औरतों ने हर फ़ील्ड में अपनी जगह बनाई है। फिर चाहे वो डिफ़ेन्स मिनिस्टर हो, फ़ाइनैन्स मिनिस्टर हो , विदेश मंत्री हो या स्पेस में हो हर जगह नारी ने अपना परचम लहराया है। तो मैं नारी के काम करने के ख़िलाफ़ कैसे हो सकता हूँ। उस विडीओ इंटर्व्यू में मैं सिर्फ़ नारी के बाहर जाकर काम करने से क्या दिक़्क़तें आ सकती हैं उस पर रोशनी डाल रहा था। जैसे घर के बच्चे अकेले पड़ जातें हैं। मैं पुरुष और नारी धर्म की बात कर रहा था जो हज़ारों सालों से चला आ रहा है। मैंने ये नहीं कहा कि नारी बाहर जाती है तो Me Too होता है। मैंने एक साल पहले इसी टॉपिक पर एक विडीओ बनाई थी जो मैं आप लोगों को दिखाना चाहता हूँ कि तब भी मैंने यही कहा था कि नारियों को अपने काम काने की जगह पर अपनी सुरक्षा कैसे करनी चाहिये। मैंने तब भी नहीं कहा कि नारियाँ काम पर ना जाएँ। तो आज कैसे कह सकता हूँ। मैं अपने सभी दोस्तों से यही कहना चाहता हूँ कि मेरे स्टेट्मेंट को ग़लत तरीक़े से मत पेश करें। मेरा पिछला चालीस साल, मेरा फ़िल्मी सफ़र इस बात की पुष्टि करता है मैंने हमेशा नारियों की इज़्ज़त की है। इस बात को हर कलाकार या हर फ़िल्म यूनिट का मेम्बर जानता है कि मैंने हमेशा सबकी इज़्ज़त की है।अगर कोई भी नारी मेरे इस स्टेट्मेंट से आहत हुई हो तो मुझे अफ़सोस है कि मैं अपनी बात सही ढंग से नहीं रख पाया। मुझे इस बात की चिंता नहीं कि नारी समाज मेरे ख़िलाफ़ हो जाएगा। उन्हें होना भी नहीं चाहिए।मेरी ज़िंदगी खुली किताब है। सब जानते हैं कि मैंने कैसे ज़िंदगी जी है और कैसे जी रहा हूँ। मैं अपना वही इंटर्व्यू आपको पूरा दिखाना चाहता हूँ जिसमें से ये क्लिपिंग ली गई है। आपको पता चलेगा मैं नारियों के प्रति क्या विचार रखता हूँ।

    A post shared by Mukesh Khanna (@iammukeshkhanna) on

    मुकेश खन्ना म्हणाले, "सोशल मीडियावर माझा जो व्हिडीओ व्हायरल होतो आहे, तो फक्त एक छोटासा भाग आहे आणि त्यावरून मला चुकीचं ठरवू शकत नाही. मी हे नाही म्हणालो की महिला बाहेर जातात तेव्हा Me Too होतं. मी एक वर्षापूर्वी याच विषयावर एक व्हिडीओ बनवला होतो, जो मी तुम्हाला दाखवू इच्छितो. तेव्हादेखील मी हेच म्हणालो होतो की, महिलांनी आपल्या कामाच्या ठिकाणी आपली सुरक्षा कशी करावी. मी तेव्हादेखील महिलांनी कामावर जाऊ नये, असं म्हणालो नव्हतो मग आज कसं म्हणू शकतो" हे वाचा - "MeToo ला कारणीभूत महिलाच", वादग्रस्त VIDEO मुळे 'शक्तिमान'वर बरसले नेटिझन्स "मी माझ्या सर्व मित्रांना हेच सांगू इच्छितो की माझ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढू नका. माझी गेली चाळीस वर्षे, माझा फिल्मी प्रवास हे सिद्ध करतं की मी नेहमी महिलांचा सन्मान केला आहे. याबाबत प्रत्येक कलाकार, प्रत्येक फिल्म युनिटच्या मेंबरला माहिती आहे की मी नेहमी सर्वांचा सन्मान केला आहे. जर महिलांबाबत माझ्या या वक्तव्यामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी माझं म्हणणं नीट मांडू शकलो नाही, याची मला खंत आहे", असं ते म्हणाले. हे वाचा - मिस्टर परफेक्शनिस्टविरोधात तक्रार; भाजप नेता म्हणतो, 'हा नियम मोडला' "महिला वर्ग माझ्याविरोधात जाईल, याची मला चिंता नाही. त्यांनी होऊदेखली नये. माझं आयुष्य खुलं पुस्त आहे. मी कसं आयुष्य जगलो आणि कसं जगत आहे, हे सर्वांना माहिती आहे. मी माझा तीच मुलाखत तुम्हाला पूर्ण दाखवत आहे, ज्यातून ही छोटी क्लिप घेण्यात आली आहे. तुम्हाला समजेल महिलांप्रती माझे काय विचार आहेत", असं म्हणत त्यांनी आपला व्हिडीओ शेअर केला आहे.
    Published by:Priya Lad
    First published: