Home /News /entertainment /

‘मला त्याच्या आत्महत्येची चाहुल लागली होती...’ मुकेश भट्ट यांचा धक्कादायक खुलासा

‘मला त्याच्या आत्महत्येची चाहुल लागली होती...’ मुकेश भट्ट यांचा धक्कादायक खुलासा

निर्माता मुकेश भट यांनी सुशांतच्या आत्महत्येबद्दल नवा खुलसा केला आहे. सुशांत असं काही तरी करेल असं याची मला चाहुल लागली होती असं त्यांनी म्हटलं आहे.

    मुंबई, 15 जून : बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. वयाच्या 34 व्या वर्षीच जगाचा असा अचानक निरोप घेणाऱ्या सुशांत जाणं सर्वांच्या मनाला चटका लावून गेलं. त्याच्या निधनानंतर बॉलिवूडला धक्का बसाल आहे. सुशांतला श्रद्धांजली वाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी ते ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर पर्यंत सर्वांनीच ट्वीट केले. त्यानंतर आता निर्माता मुकेश भट यांनी सुशांतच्या आत्महत्येबद्दल नवा खुलसा केला आहे. सुशांत असं काही तरी करेल असं याची मला चाहुल लागली होती असं त्यांनी म्हटलं आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर टाइम्स नाऊशी बोलताना मुकेश भट यांनी सुशांतच्या आत्महत्येची चाहुल लागली होती असं म्हटलं आहे. ते म्हणाले, 'मी त्याला अनेकदा भेटलो होतो. पहिल्यांदा तो मला ‘आशिकी 2’च्या वेळी भेटला होता. पण त्यावेळी काही करणांनी या सिनेमासाठी आम्ही त्याला कास्ट करू शकलो नाही. पण जेव्हा आम्ही ‘सडक 2’ करण्याचा विचार केला होता तेव्हा आलिया आणि महेश भटनी मला सुशांतचं नाव सुचवलं होतं. मी त्याला भेटायला बोलवलं. तो आला आणि आम्ही वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली.' सुशांतच्या आत्महत्येचं कारण आर्थिक परिस्थिती नाही, बहिणीनं केला मोठा खुलासा मुकेश भट पुढे म्हणाले, 'आम्ही बराच वेळ चर्चा करत होतो. पण त्यावेळी मला चटकन समजलं की तो कुठेतरी हरवलेला आहे. काहीतरी आहे ज्यामुळे तो गोंधळला आहे हे मला तेव्हाच जाणवलं होतं. त्याचं बोलण्याकडे पूर्ण लक्ष नव्हतं. हे सर्व एक-दीड वर्षांपूर्वी घडलं होतं आणि मला तेव्हाच तो खूपच डिस्टर्ब असलेला जाणवलं. आम्ही बोलत असताना जणू तो त्या ठिकाणीच नव्हता. त्याच्या मनात काहीतरी वेगळं सुरू होतं. त्यावेळी मला चाहुल लागली होती की, काहीतरी वेगळं आहे आणि काहीतरी वाईट घडणार आहे.' सुशांत बद्दल मुकेश यांनी अभिनेत्री परवीन बाबी यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, 'मी माझ्या करिअरची सुरुवात परवीन बाबी सोबत केली होती. ती सुद्धा अशीच नैराश्याची शिकार झाली होती. जेव्हा मी सुशांतचं निरिक्षण केलं होतं तेव्हा मी माझ्या भावाला म्हटलं होतं. मला भीती वाटते की हा मुलगा परवीनच्या पावलावर पाऊल तर ठेवत नाही आहे ना? त्याच्या आत्महत्येबद्दल जेव्हा मला समजलं तेव्हा मला धक्का बसाल नाही कारण मला ते आधीच जाणवलं होतं.' सिनेमात ज्या मुलाला मरणातून वाचवलं, त्यानेच सुशांतसाठी लिहिली इमोशनल पोस्ट मुकेश भट यांच्या या स्टेटमेंटनंतर सिंगर आणि राजकीय नेता बाबुल सुप्रियो यांनी हे सर्व धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'मी मुकेश भट यांची टाइम्स नाऊला दिलेली प्रतिक्रिया वाचली. ते माझे चांगले मित्र आहे. ते सुशांतला त्यांच्या ‘आशिकी 2’ आणि ‘सडक 2’साठी कास्ट केलं नाही. ते त्यांचं व्यवसायिक कारण असू शकतं. पण त्यांना हे जाणवत असूनही त्यांनी सुशांतला त्यातून बाहेर निघण्यास मदत केली नाही हे अत्यंत लाजिरवाणं होतं.' ‘छिछोरे’नंतर सुशांतकडून का काढून घेतले गेले 7 सिनेमे? संजय निरूपम यांचा सवाल
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood, Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या