तेल विकण्यापासून ते अभिनेत्रीपर्यंत मुग्धा गोडसेचा प्रवास, अशी मिळाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

तेल विकण्यापासून ते अभिनेत्रीपर्यंत मुग्धा गोडसेचा प्रवास, अशी मिळाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

बॉलिवूडमध्ये येण्याआधी मुग्धा गोडसेचा संघर्ष; विश्वासही बसणार नाही अशी केलीत कामं

  • Share this:

मुंबई, 26 जुलै: बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मुग्धाचा आज वाढदिवस आहे. आपल्या कलेनं अभिनयानं चाहत्यांच्या मनाला भुरळ घालणाऱ्या मुग्धाचा बॉलिवूडपर्यंतचा संघर्ष खूप मोठा आहे. अभिनेता राहूल देवसोबत लग्नाच्या बंधनात अडकल्यानंतर मात्र मुग्धा तशी सिनेमांपासून दूरच राहिली.

मुग्धानं आपलं शिक्षण पुण्यातील एमएमसीसी कॉलेजमधून केलं आहे. 'मला सगळ्या गोष्टी त्यावेळी करायच्या होत्या. वाचन, लेखन, कॉलेज लाइफची मजा घ्यायची होती. बॉयफ्रेंड हवा होता. कॉलेजच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचं होतं. तिचे सगळे मित्र-मैत्रिणी जास्त पैसे मिळावेत म्हणून पार्ट टाइम छोटी मोठी काम करायचे. '

View this post on Instagram

Black n white memory... not so long ago!!! #photography #indian #fun #quarantine

A post shared by MugdhaVeiraGodse (@mugdhagodse) on

हे वाचा-Dzire, Verna की Kwid, कोणती BS-VI कार देते सर्वात जास्त मायलेज?

'मला घरातून केवळ 300 रुपये पॉकेटमनी मिळत होता. मीही तेल विकण्यापासून ते पेट्रोलपंपाच्या सर्व्हेपर्यंत अनेक कामं केली. त्यातून वरचे पैसे मिळायला लागले. मध्यमवर्गीय कुटुंबातून असल्यामुळे वरखर्चाला लागणार पैसे मी माझे मिळवायला लागले', असं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुग्धानं सांगितलं आहे.

हे वाचा-मोठी बातमी! सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी बॉलीवूडमधील बड्या दिग्दर्शकाची चौकशी

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी मुग्धा प्रसिद्ध मॉडेल होती. 2002 रोजी 'ग्लॅडरग्स मेगा मॉडेल हंट' तिने जिंकलं होतं. त्यानंतर 2004 मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेची उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली होती. 'फॅशन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये मुग्धानं पदार्पण केलं. या चित्रपटातील तिच्या भूमिकेमुळे तिला फिल्मफेअरचा 'बेस्ट डेब्यू' पुरस्कारही मिळाला. त्यानंतर ऑल द बेस्ट, हिरोईन सारखे चित्रपट मुग्धाने केले.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 26, 2020, 4:04 PM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या