'मुबारका'ला मिळालं वीकेन्ड सरप्राईज'

'मुबारका'ला मिळालं वीकेन्ड सरप्राईज'

पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर मुबारकाने 5 कोटी कमवले तर शनिवारी 7.38 कोटी कमवले तर रविवारी 10.37 कोटी रूपये कमवले. अशी एकूण 22.91 कोटींची कमाई मुबारकाने केली.

  • Share this:

31 जुलै: अर्जुन कपूरचा डबल रोल असलेल्या 'मुबारका' या सिनेमाने पहिल्या वीकेन्डला चांगली कमाई केली आहे तर बॉक्स ऑफिसवर थंड सुरूवात करणाऱ्या 'लिपस्टिक अंडर माय बुरखा'च्या कमाईलाही आता वेग आला आहे.

पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर मुबारकाने 5 कोटी कमवले तर शनिवारी 7.38 कोटी कमवले तर रविवारी 10.37 कोटी रूपये कमवले. अशी एकूण 22.91 कोटींची कमाई मुबारकाने केली.

तर दुसरीकडे लिपस्टिक अंडर माय बुरखाच्या कमाईला पण वेग आला आहे. पहिल्या आठवड्यात या सिनेमाने 10 कोटी रूपये कमवले दुसऱ्या आठवड्याच्या शुक्रवारी 94 लाख, शनिवारी 1.37 कोटी आणि रविवारी 1.45 कोटी कमवले. एकूण या सिनेमाने 14 कोटी कमवलेत अशी माहिती ट्रेड गाईड तरण आदर्शने ट्विट करून सांगितली आहे.

First published: July 31, 2017, 3:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading